अ‍ॅपशहर

पत्नीचे बहिणीसोबत संबंध; पतीची पोलिसांत तक्रार

पत्नी ही लेस्बियन असून तिचे माझ्या चुलत बहिणीसोबत शारीरिक संबंध आहे, असा आरोप करीत पतीनं पत्नीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. संबंध तोडून टाकण्याचे सांगितल्यानंतर तिनं आत्महत्या करण्याची धमकी दिल्याने मी व माझ्या कुटुंबातील व्यक्ती प्रचंड तणावाखाली असल्याचे त्याने म्हटले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Sep 2018, 3:14 pm
कानपूर (उत्तर प्रदेश)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम women


पत्नी ही लेस्बियन असून तिचे माझ्या चुलत बहिणीसोबत शारीरिक संबंध आहे, असा आरोप करीत पतीनं पत्नीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. संबंध तोडून टाकण्याचे सांगितल्यानंतर तिनं आत्महत्या करण्याची धमकी दिल्याने मी व माझ्या कुटुंबातील व्यक्ती प्रचंड तणावाखाली असल्याचे त्याने म्हटले आहे.

उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये ही घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या जोडप्याचा पाच महिन्यापूर्वीच विवाह झाला आहे. परंतु, पाच महिन्यात पत्नी माझ्यापेक्षा तिच्या मैत्रिणीकडे (ननंद) जास्त वेळ घालवते. ज्यावेळी मी घराबाहेर असतो त्यावेळी माझी चुलत बहिण आणि माझी पत्नी या एकत्र राहतात. दोघींच्याही वागण्यात, बोलण्यात खूप बदल झाला असून माझ्या पत्नीनं तर माझ्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.

शनिवारी या दोघींनाही मी व माझ्या कुटुंबानं नको त्या स्थितीत पाहिले. हे पाहिल्यानंतर तिचा प्रचंड राग आला व हे काय चाललेय असा जाब विचारल्यानंतर तिनं आत्महत्या करण्याची धमकी दिली आहे. तिच्या या धमकीमुळे माझे कुटुंब प्रचंड घाबरले आहे, असे पतीनं तक्रारीत म्हटलंय.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज