बेंगळुरू : कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी (Satish Jarkiholi) यांनी हिंदू (Hindu) शब्दाबाबत एक विधान केल्याने राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काँग्रेस नेत्याच्या या वक्तव्यानंतर वाद अधिकच चिघळत चालला आहे. हिंदू हा शब्द भारती. नाही, असे काँग्रेस नेते सतीश जारकीहोळी यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, हिंदू हा शब्द पर्शियातून आला आहे. तसेच हिंदू शब्दाचा अर्थही अत्यंत गलिच्छ असल्याचे सांगितले. (satish jarkiholi made a controversial statement) सतीश जारकीहोळी यांच्या या वक्तव्यानंतर सगळेच विरोधकांनी जारकीहोळी यांच्यावर हल्ला चढवायला सुरुवात केली आहे. कर्नाटकातील बेलगावी जिल्ह्यातील निप्पाणी भागात आयोजित कार्यक्रमात काँग्रेस नेते जारकीहोळी सहभागी झाले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
क्लिक करा आणि वाचा- २०२४ मध्येही एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री असतील; देवेंद्र फडणवीसांनी मनातले सगळे सांगितले
हिंदू या शब्दाचा अर्थ अतिशय घाणेरडा आहे: जारकीहोळी
काँग्रेस नेते सतीश जारकीहोळी यांनी हिंदू या शब्दाचा अर्थ अत्यंत घाणेरडा असल्याचे म्हटले आहे. हिंदू हा शब्द भारतीय नसून तो परदेशी असलेल्या फारसी या भाषेतील शब्द आहे, असेही त्यांनी सांगितले. हिंदू हा शब्द तर बळजबरीने आमच्यावर थोपवला जात आहे, असे जारकीहोळी यांनी म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा- महाराष्ट्रातील मराठा नेते शरद पवार यांनी संपवले; माजी मंत्र्याने केला गंभीर आरोप
तसे पाहायला गेले तर हिंदू या शब्दाला काहीच अर्थ नाही आहे. जो शब्द आपल्या देशातील नाही त्या शब्दासाठी आमच्यावर दबाव का टाकला जात आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. हिंदू हा शब्द परकीय आहे, त्याबद्दल आपल्या देशात चर्चाच व्हायला नको, असेही त्यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा- केंद्रीय मंत्री भागवत कराड यांचे उद्धव ठाकरेंच्या त्या वक्तव्यावर जोरदार प्रहार, म्हणाले...