कर्नाटक जागावाटप जाहीर
कर्नाटकात काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलात (जेडीएस) बुधवारी जागावाटप झाले यानुसार काँग्रेस २० जागा लढविणार असून, जेडीएस आठ जागा लढविणार आहे...
बेंगळुरू : कर्नाटकात काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलात (जेडीएस) बुधवारी जागावाटप झाले. यानुसार काँग्रेस २० जागा लढविणार असून, जेडीएस आठ जागा लढविणार आहे. जेडीएसने शिमोगा, तुमकूर, हसन, मंड्या, उत्तर बेंगळुरू, उत्तर कन्नड, चिकमंगळूर आणि विजयपुरा या आठ जागा मिळवल्या आहेत. बहुचर्चित म्हैसूर-कोडगू जागा काँग्रेसला मिळाली आहे.