अ‍ॅपशहर

गिलानी यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा

काश्मीरमधील दहशतवाद्यांना फंड पुरविल्याप्रकरणी एनआयएच्या रडारवर आलेले फुटीरतावादी नेते सैय्यद अली शाह गिलानी यांनी अखेर तहरीक-ए- हुर्रियत कॉन्फरन्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्या स्थापनेपासून सलग १८ वर्ष त्यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. पक्षाचे ज्येष्ठ नेते मुहम्मद अशरफ सेहराई यांची हुर्रियतचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Mar 2018, 3:23 pm
श्रीनगर : काश्मीरमधील दहशतवाद्यांना फंड पुरविल्याप्रकरणी एनआयएच्या रडारवर आलेले फुटीरतावादी नेते सैय्यद अली शाह गिलानी यांनी अखेर तहरीक-ए- हुर्रियत कॉन्फरन्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्या स्थापनेपासून सलग १८ वर्ष त्यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. पक्षाचे ज्येष्ठ नेते मुहम्मद अशरफ सेहराई यांची हुर्रियतचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kashmir syed ali shah geelani resigns as president of hurriyat conference
गिलानी यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा


टेरर फंडिंग प्रकरणात नाव आल्यानंतर तपास यंत्रणेच्या कारवाईच्या भीतीने गिलानी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. २००१ मध्ये हुर्रियतची स्थापना झाली. तेव्हा पासून त्यांनी संघटनेचं अध्यक्षपद सांभाळलं होतं. दरम्यान, आयबीने एका अधिकाऱ्यामार्फत चर्चेची ऑफर दिली होती. मात्र आपण ती नाकारल्याचं गिलानी यांनी शुक्रवारी म्हटलं होतं.

गिलानी यांच्या कुटुंबीयांकडे एकूण १४ मालमत्ता असून त्याची किंमत १५० कोटी एवढी आहे. त्यांचा मोठा मुलगा नईम हा सर्जन असून दुसरा मुलगा जम्मू-कश्मीर सरकारमध्ये नोकरीला आहे. टेरर फंडिंग प्रकरणी तपास यंत्रणेने गिलानी यांच्या दोन्ही मुलांची चौकशी केली होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज