अ‍ॅपशहर

काश्मीर हिंसाचारातील मृतांची संख्या ४४

काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दल आणि आंदोलकांमध्ये होत असलेल्या चकमकीत काही दिवसांपूर्वी जखमी झालेल्या तरुणाचा शुक्रवारी मृत्यू झाला. गेल्या दोन आठवड्यांपासून धुमसत असलेल्या काश्मीरमधील मृतांची संख्या आता ४४ झाली आहे. प्रशासनाने १० जिल्ह्यांमधील जमावबंदी कायम ठेवली आहे.

Maharashtra Times 22 Jul 2016, 8:53 pm
वृत्तसंस्था, श्रीनगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kashmir unrest kupwara man succumbs death toll 44
काश्मीर हिंसाचारातील मृतांची संख्या ४४

काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दल आणि आंदोलकांमध्ये होत असलेल्या चकमकीत काही दिवसांपूर्वी जखमी झालेल्या तरुणाचा शुक्रवारी मृत्यू झाला. गेल्या दोन आठवड्यांपासून धुमसत असलेल्या काश्मीरमधील मृतांची संख्या आता ४४ झाली आहे. प्रशासनाने १० जिल्ह्यांमधील जमावबंदी कायम ठेवली आहे.

शुक्रवारी मृत झालेल्या तरुणाचे नाव इश्तियाक अहमद असून तो अनंतनाग जिल्ह्यातील कोकेरनागचा रहिवासी आहे. गेल्या ८ जुलै रोजी दहशतवादी बुऱ्हान वाणी हा लष्कराबरोबरच्या चकमकीत मारला गेल्यानंतर काश्मीरमध्ये फुटरतावाद्यांकडून हिंसाचार सुरू आहे. गुरुवारी हिंसेची कोणतीही घटना घडली नाही. मात्र, शुक्रवारी प्रार्थनास्थळांवर होणारी गर्दी लक्षात घेता, सुरक्षेच्या कारणासाठी जमावबंदी कायम ठेवण्यात आली.

शाळा सुरू करण्याच्या उद्देशाने बारामुल्ला, बंदिपुरा, बडगाम आणि गंदरबाल या जिल्ह्यांमध्ये गुरुवारी जमावबंदी शिथिल करण्यात आली होती. मात्र, पालकांनी आपल्या मुलांना भीतीपोटी घराबाहेर पडू न दिल्याने शाळा बंदच राहिल्या. मोबाइल फोन आणि इंटरनेट सेवा अद्यापही बंदच ठेवण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज