अ‍ॅपशहर

shivraj paswan : बेछुट गोळीबार करत महापौरांची हत्या, छातीत घुसल्या तीन गोळ्या

कटिहारचे महापौर शिवराज पासवान यांची गोळ्या घातून हत्या करण्यात आली आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणी पुढील कारवाई करण्यात येत आहे. दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्याचं सांगण्यात येतंय.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Jul 2021, 1:24 am
कटिहारः बिहारच्या किटहारमध्ये महापौर शिवराज पासवान यांची गोळ्या घालून हत्या करण्यात ( katihar mayor shivraj paswan shot dead ) आली आहे. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गुरुवारी अतिशय जवळून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या गोळ्या त्यांच्या छातीत घुसल्या.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम katihar mayor shivraj paswan shot dead three bullets fired in chest
बेछुट गोळीबार करत महापौरांवरांची हत्या, छातीत घुसल्या तीन गोळ्या


कटिहारचे महापौर शिवराज पासवान यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. ही हत्या कुठल्या कारणाने करण्यात आली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. विशेष म्हणजे महापौर शिवराज पासवान यांची हत्या ही त्यांच्या संतोषी कॉलनी वॉर्डात करण्यात आली.

दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर जवळून हल्ला केला. हल्लेखोराने बेछुट गोळीबार केला. यापैकी तीन गोळ्या त्यांच्या छातीत घुसल्या आणि ते जमिनीवर कोसळले. यानंतर हल्लेखोर फरार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासन हादरले आहे.

हत्येच्या घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकाबंदी केली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. हल्ल्यात जखमी झालेल्या शिवराज पासवान यांना तात्काळ कटिहार मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं. छातीत तीन गोळ्या घुसल्यामुळे त्यांना वाचवता आलं नाही, असं सांगण्यात येत आहे. पोलिसांकडून अद्याप कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही.

CCTV फुटेज : मॉर्निंग वॉकला निघालेल्या न्यायाधीशाला टेम्पोची जाणून बुजून धडक

मंदिरात दर्शन घेऊन परतत असताना हत्या

मंदिरात दर्शन घेतल्यावर घरी परतत असताना त्यांच्या हल्ला झाला. त्यांचा अंगरक्षकही सापडला. घटनेवेळी तो त्यांच्यासोबत नव्हता. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. घटनेनंतर संपूर्ण संतोषी चौक परिसरात गोंधळाचं वातावरण आहे. शेकडोंच्या संख्येत नागरिक हॉस्पिटलमध्ये दाखल होत आहेत.

Monsoon Session: 'बिहारी गुंडा', महुआ मोईत्रांनी 'शिवी' दिल्याचा भाजप खासदाराचा आरोप

महत्वाचे लेख