चंडीगड : अभिनेता सनी देओल यांना भाजपने गुरुदासपूर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे चार वेळा खासदार राहिलेले दिवंगत केंद्रीय मंत्री विनोद खन्ना यांच्या पत्नी कविता खन्ना नाराज झाल्या आहेत. कविता या भाजपकडून या मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक होत्या. 'माझ्यासोबत विश्वासघात झाला असून, अपक्ष निवडणूक लढण्यासह माझ्यासमोर सर्व पर्याय खुले आहेत,' असे कविता खन्ना यांनी म्हटले आहे. गुरुदासपूर मतदारसंघात सध्या काँग्रेसचे सुनील जाखड विद्यमान खासदार आहेत. विनोद खन्ना यांच्या निधनानंतर २०१७मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत जाखड निवडून आले होते. त्यांनी भाजपचे उमेदवार स्वर्ण सलारिया यांचा पराभव केला होता. पोटनिवडणूक लढवण्यास कविता खन्ना इच्छुक होत्या. मात्र, भाजपने त्या वेळी उद्योजक सलारिया यांना उमेदवारी दिली होती.
कविता खन्ना यांची भाजपवर नाराजी
अभिनेता सनी देओल यांना भाजपने गुरुदासपूर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे...
MT 25 Apr 2019, 4:00 am