अ‍ॅपशहर

केजरीवालांच्या घशावर शस्त्रक्रिया होणार

खोकल्याच्या विकारानं त्रस्त असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घशावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. येत्या १३ सप्टेंबर रोजी बेंगळुरू येथे ही शस्त्रक्रिया होणार असून या दरम्यान केजरीवाल राजकारणापासून पूर्ण लांब राहणार आहेत.

Maharashtra Times 6 Sep 2016, 11:29 am
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kejriwal to undergo throat surgery in bengaluru
केजरीवालांच्या घशावर शस्त्रक्रिया होणार


खोकल्याच्या विकारानं त्रस्त असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घशावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. येत्या १३ सप्टेंबर रोजी बेंगळुरू येथे ही शस्त्रक्रिया होणार असून या दरम्यान केजरीवाल राजकारणापासून पूर्ण लांब राहणार आहेत.

शस्त्रक्रियेनंतर केजरीवाल बेंगळुरू येथे दहा दिवस विश्रांती घेणार आहेत. २२ सप्टेंबर रोजी ते दिल्लीत परतणार असून त्यांच्या अनुपस्थितीत उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया हे दिल्ली सरकारचा कारभार पाहतील, अशी माहिती एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यानं दिली. शस्त्रक्रिया व त्यानंतरच्या विश्रांतीसाठी १५ दिवस जाणार असल्यानं बेंगळुरूला रवाना होण्यापूर्वी ते चार दिवसांचा पंजाब दौरा करून निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. तिथं ते स्थानिक नेत्यांना भेटणार असून जाहीर सभाही घेणार आहेत.

गेल्या वर्षी केजरीवाल यांनी बेंगळुरू येथील जिंदाल नेचर केअर इन्स्टिट्यूटमध्ये १२ दिवस राहून नेचरोपथी उपचार घेतले होते. त्यानंतर जानेवारी महिन्यात पुन्हा दहा दिवस तिथं मुक्काम केला होता. गेल्या महिन्यात हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथील ध्यानधारणा केंद्रामध्ये दहा दिवसीय विपश्यना शिबिरातही सहभाग घेतला होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज