अ‍ॅपशहर

सणासुदीला केरळमध्ये ऑनलाइन दारू

देशातील काही राज्यांत दारूबंदी असताना व काही राज्यांत बंदीची मागणी होत असताना केरळमध्ये मात्र दारूला चांगले दिवस आले आहेत. केरळमधील तळीरामांना यापुढं दारूसाठी रांगा लावाव्या लागणार नाहीत. कारण, सणासुदीच्या दिवसांत दारूची ऑनलाइन विक्री करण्याची परवानगी सरकारनं दिली आहे.

Maharashtra Times 19 Aug 2016, 11:04 am
मटा ऑनलाइन वृत्त । कोझीकोडे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kerala govt body to sell booze online
सणासुदीला केरळमध्ये ऑनलाइन दारू

देशातील काही राज्यांत दारूबंदी असताना व काही राज्यांत बंदीची मागणी होत असताना केरळमध्ये मात्र दारूला चांगले दिवस आले आहेत. केरळमधील तळीरामांना यापुढं दारूसाठी रांगा लावाव्या लागणार नाहीत. कारण, सणासुदीच्या दिवसांत दारूची ऑनलाइन विक्री करण्याची परवानगी सरकारनं दिली आहे.

केरळ सरकारच्या अखत्यारित असलेल्या सहकार महासंघानं 'ओनम'च्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. सणाच्या दिवशी लोकांना रांगा लावाव्या लागू नयेत, यासाठी हा निर्णय घेतल्याचं महासंघाचे अध्यक्ष एम. मेहबूब यांनी सांगितलं. 'सरकारकडे नोंदणी असलेल्या ५९ ब्रॅंडच्या दारूची ऑनलाइन विक्री करता येईल. ग्राहकांना कमीत कमी दरामध्ये दर्जेदार उत्पादनं उपलब्ध करून देण्याचा उद्देशही यामागं आहे,' असंही मेहबूब यांनी म्हटलं आहे. मात्र, यामुळं केरळमधील डाव्या सरकारवर टीकाही सुरू झाली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज