अ‍ॅपशहर

पोळ्या लाटून तिनं मुलाला बनवलं IPS

एका गावात एक अधिकारी येतो काय...त्याला पाहून आपणही असंच मोठं साहेब होण्याचं स्वप्न एक मुलगा पाहतो काय... परिस्थितीमुळे आपल्या मुलाचे शिक्षण थांबू नये म्हणून त्याची आई पोळ्या लाटायचे काम करायचे ठरवते काय...

Bharat Yagnik | TNN 2 May 2018, 2:45 pm
अहमदाबाद:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kilos of rotis charity behind his upsc success
पोळ्या लाटून तिनं मुलाला बनवलं IPS


एका गावात एक अधिकारी येतो काय...त्याला पाहून आपणही असंच मोठं साहेब होण्याचं स्वप्न एक मुलगा पाहतो काय... परिस्थितीमुळे आपल्या मुलाचे शिक्षण थांबू नये म्हणून त्याची आई पोळ्या लाटायचे काम करायचे ठरवते काय...आणि हा ध्येयवेडा मुलगा युपीएससी परीक्षेत देशातून ५७० वा येतो काय....ही कोणत्याही चित्रपटाची गोष्ट नाही....ही कहाणी आहे हसन साफिन आणि त्याच्या आईची.

गुजरातमधील पालनपूरमध्ये साफिनचे कुटुंब गेली अनेक वर्ष राहत आहे. एकदा गावात कार्यक्रमासाठी मोठे अधिकारी आले होते. त्यांच्या स्वागताला गावातील बड्या हस्ती स्वत: हजर होत्या. गावची सुधारणा करण्याचं आश्वासनं हा अधिकारी देत होता. हे सगळं पाहून आपल्यालाही असंच मोठं अधिकारी व्हायचंय असं साफिननं मनाशी पक्कं केलं. अधिकारी पदापर्यंत पोहोचायला प्रचंड कष्ट घेऊन परीक्षा पास व्हावी लागते असा सल्ला त्याला मिळाल्यावर ही परीक्षा पास होऊन अधिकारी बनणं हेच साफिनच्या आयुष्याचं ध्येय बनलं.

आयुष्याचं ध्येय निश्चित करणे त्याच्यासाठी सोपं होतं, मात्र ध्येयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मात्र प्रचंड खडतर होता. हिरे व्यापाऱ्याकडे मजूर म्हणून काम करणाऱ्या त्याच्या पालकांकडे मुलांना कसं-बसं जेऊ घालायला पैसे होते, परंतु त्यांच्या शिक्षणाचा खर्च मात्र यांना परवडणारा नव्हता. आपल्या मुलाचं ध्येय त्यानं गाठावं यासाठी साफिनच्या आईनं पुढाकार घेतला आणि पैसे कमावण्यासाठी तिनं पोळ्या बनवण्याचं काम सुरू केलं. पालमपूरमधील हॉटेलपासून ते लग्न समारंभापर्यंत प्रत्येक ठिकाणी मागणीनुसार पोळ्या बनवण्याचं कष्टाचं काम मुलाचं शिक्षण थांबू नये म्हणून आईनं स्वीकारलं. पहाटे ३ वाजता उठून ती पोळ्या लाटायला सुरूवात करायची. कडक उन्हाळा असो किंवा गोठवणारी थंडी या माऊलीचं काम अविरतपणे सुरू असायचं.२० किलोपासून ते २०० किलोपर्यंत जशी मागणी असेल त्यानुसार ती पोळ्या लाटून द्यायची. यातून तिला मिळणारे ५ हजार - ८ हजार रूपये ती आपल्या दोन्ही मुलांच्या शिक्षणासाठी साठवायची.

'मी पहाटे अभ्यास करायला उठायचो तेव्हा माझ्या आईचे कष्ट पाहिलेत. बाहेर कितीही थंड वातावरण असले तरी तिला अनेक तास चुलीशेजारी आमच्यासाठी घाम गाळताना मी बघितलंय. अन्नासाठी पैसे नाहीत म्हणून आम्ही अनेकदा उपाशीपोटी झोपी गेलोय, पण आमच्या शिक्षणासाठी मात्र तिनं कधीच पैसे कमी पडू दिले नाहीत. या प्रवासात अनेक चांगल्या लोकांनी पुढाकार घेत माझ्या शिक्षणाचा खर्चही उचलला. मी त्यांचा कायम ऋणी असेन' असं साफिननं सांगितलं.
लेखकाबद्दल
Bharat Yagnik
Bharat Yagnik is special correspondent at The Times of India, Ahmedabad, and reports on education-related issues, including primary school and higher and technical education. His interest areas include travelling and has recently been to Mansarovar.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज