अ‍ॅपशहर

देशातल्या हजारो शेतकऱ्यांचा दिल्लीत मोर्चा

देशभरातल्या हजारो शेतकऱ्यांनी आज दिल्ली दणाणून सोडली. २० पेक्षा अधिक राज्यांतील १८२ शेतकरी संघटनांनी मिळून केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध केला. रामलीला मैदान ते संसद भवन असा हा 'किसान मुक्ती संसद' मोर्चा निघाला. ​महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनीही या मोर्चात मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

Maharashtra Times 20 Nov 2017, 10:07 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kisan mukti sansad farmers agitation in delhi
देशातल्या हजारो शेतकऱ्यांचा दिल्लीत मोर्चा

देशभरातल्या हजारो शेतकऱ्यांनी आज दिल्ली दणाणून सोडली. २० पेक्षा अधिक राज्यांतील १८२ शेतकरी संघटनांनी मिळून केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध केला. रामलीला मैदान ते संसद भवन असा हा 'किसान मुक्ती संसद' मोर्चा निघाला. ​महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनीही या मोर्चात मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

कर्जमुक्ती आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींनुसार पीकांना योग्य हमीभाव या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या ( AIKSCC) नेतृत्वाखाली हजारो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले.

इंधन, खते, किटकनाशके आणि पाण्याचेही दर एकीकडे सातत्याने वाढत आहेत, पण सरकारी अनुदान मात्र कमी होत चालले आहे. परिणामी शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत आणि कर्जबाजारी शेतकऱ्यांपुढे आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही, असे अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे म्हणणे आहे.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, स्वराज इंडियाचे नेते योगेंद्र यादव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आदि या आंदोलनात सहभागी झाले. उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव देऊ असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना दिले होते मात्र हे आश्वासन पाळण्यात आले नाही. त्याचा निषेध करण्यासाठीच सर्व कामगार संघटना एकवटल्याचे यावेळी शेट्टी यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज