गांधीनगर : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय महिला अधिवेशनात माजी मंत्री माया कोडनानी शनिवारी उपस्थित राहिल्या. माया कोडनानी यांना २००२ मधील नरोडा पाटिया हिंसाचारप्रकरणी २८ वर्षांची शिक्षा झाली होती. मात्र गुजरात हायकोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. असे असले तरी त्यांच्यावर नरोडा गाम हिंसाचारप्रकरणाचा गुन्हा दाखल असून, त्याची सुनावणी सुरू आहे. कोडनानी या आज भाजपच्या अधिवेशनात व्यासपीठावर उपस्थित होत्या. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी व अन्य महिला नेत्यांच्या शेजारी त्या बसल्या होत्या. भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर आणि खासदार सरोज पांडे याही या व्यासपीठावर उपस्थित होत्या.
भाजपच्या कार्यक्रमात कोडनानी हजर
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय महिला अधिवेशनात माजी मंत्री माया कोडनानी शनिवारी उपस्थित राहिल्या...
30 23 Dec 2018, 4:00 am