अ‍ॅपशहर

भारतीय जवानांनीच चिनी सैनिकांना चिथावले, चिनी राजदुतांच्या उलट्या बोंबा

पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर तणाव निर्माण करणाऱ्या चीनने आता उलट्या बोंबा ठोकायला सुरूवात केली आहे. एककडी चर्चेचं नाटक करून भारतावरच चिथावणीचे आरोप केलेत. भारतानेच चिनी सैनिकांना उकसवले आसा आरोप चीनच्या राजदुतांनी केला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Jul 2020, 8:45 pm
नवी दिल्ली: भारत आणि चीनमधील सीमा वादासंदर्भात दोन्ही देशांमध्ये लष्करी व मुत्सद्दी स्तरावरील चर्चा सुरू आहे. दुसरीकडे, शांततेसाठी एकतर्फी प्रयत्न करणार नाही. दोन्ही देशांनी संयुक्तपणे प्रयत्न करावे लागतील, असं भारताने स्पष्टपणे सांगितलं. यामुळे युद्धाच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी भारताने सर्व तयारी केली आहे. राफेल जेटची पहिली तुकडी बुधवारी भारतात दाखल झाली. भारताची तयारी सुरू असताना आचा चीनचे भारतातील राजदूत सन वेदोंग यांनी वादग्रस्त वक्तव्य करत दावा केलाय. सीमेवर बहुतेक भागातून दोन्ही देशांच्या सैनिक मागे हटले आहेत माघार घेतली आहे आणि जमिनीवरील तणाव कमी होत आहे, असा दावा त्यांनी केलाय.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम भारतीय जवानांनीच चिनी सैनिकांना चिथावले, चिनी राजदुतांच्या उलट्या बोंबा (प्रातिनिधिक फोटो)


बहुतेक भागांतून सैनिक मागे

'दोन्ही देशांचे सैनिक बहुतेक ठिकाणांहून मागे हटले आहेत. सीमेवरील तणाव कमी होत आहे आणि आणि तापमान कमी होत आहे. तणावाचा पारा उतरत आहे. गेल्या महिन्यात गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झालेली रक्तरंजित संघर्षाची घटना दुर्दैवी होती. अशा घटना पुन्हा होऊ नये यासाठी दोन्ही देश प्रयत्नशील असल्याचं चिनी राजदूत वेदोंग म्हणाले.

गलवानमधील रक्तरंजित संघर्षाला भारत जबाबदार

चिनी सैनिक एलएसीच्या पलिकडे कधी जात नाही. भारतीय जवानच एलएसीच्या पलिकडे गेले. त्यांनी चिनी सैनिकांना चिथावले आणि त्यामुळे हिंसक संघर्ष झाला. चिनी सैनिक भारतीय सैनिकांशी चर्चा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर हल्ला केला गेला, असा आरोप चिनी राजदुतांनी केलाय.

'दोन्ही देशांनी संबंध सुधारले पाहिजेत'

दोन्ही देशांमधील संबंध आज नाजूक वळणावरून जात आहेत. यामुळे संबंधांना सावधगिरीने, शांतता आणि तर्कशुद्धतेने हाताळण्याची आवश्यकता आहे. यावर दोन्ही देशांनी पुढे जायला हवे.चीन परस्पर सहकार्याचा पुरस्कार करतो. चीनची अर्थव्यवस्था खूप मजबूत आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेला भारताने विरोध करणे योग्य नाही. दोन्ही देशांमधील व्यापार सुरू राहिला पाहिजे. दोन्ही देशांनी अधिक चांगले व्यापारी वातावरण निर्माण केले पाहिजे, असं ते म्हणाले.

परिस्थिती चिघळली! चीन सीमेवर भारत आणखी ३५ हजार जवान तैनात करणार

प्रियांका गांधींनी सरकारी बंगला खाली केला; लखनऊत नाही, तर इथे राहणार!

'चीनने आपले सार्वभौमत्व दृढतेने वाढवले'

चीन आपले सार्वभौमत्व दृढपणे वाढवतोय आणि त्यादरम्यान कधीही आक्रमकता किंवा साम्राज्यवादाचे धोरण स्वीकारलेले नाही. चीनने आपल्या राष्ट्रीय सार्वभौमत्व, सुरक्षा आणि विकासाच्या हिताचे दृढपणे रक्षण केले आहे. इतर देशांवर आक्रमकता दाखवून आम्ही आपला विकास कधीच केलेला नाही, असं चिनी राजदूत वेदोंग म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज