अ‍ॅपशहर

sharad pawar : शरद पवारांना भेटले लालू प्रसाद यादव; भेटीनंतर म्हणाले...

संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना दिल्लीतील राजकीय वातावरण तापलं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षांच्या भेटल्या. आता राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव हे विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी घेत आहेत. त्यांनी शरद पवारांचीही आज भेट घेतली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Aug 2021, 8:53 pm
नवी दिल्लीः राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या राजकीय भेटीगाठींना वेग आला आहे. लालू प्रसाद यादव यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट ( lalu prasad yadav meets sharad pawar ) घेतली. लालू प्रसादांनी सोमवारी समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांची भेट घेतली होती. गेल्या आठवड्या स्वतः शरद पवार यांनी त्यांची भेट घेतली होती. आता शरद पवारांची ( sharad pawar ) भेट घेतल्यानंतर लालू प्रसादांनी माध्यमांना माहिती दिली. शरद पवारांशिवाय संसद भकास वाटते. मी, शरद भाई आणि मुलायम सिंह यादव आम्ही अनेक मुद्द्यांवर एकसाथ लढलो, असं लालू प्रसाद यादव म्हणाले. पिगासस हेरगिरी प्रकरणी चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम lalu prasad yadav meets sharad pawar
शरद पवारांना भेटले लालू प्रसाद यादव; भेटीनंतर म्हणाले...


पंतप्रधान मोदींविरोधात राजकीय खेळी?

लालू प्रसाद यादव यांनी मंगळवारी शरद पवारांची भेट घेतली. तसंच त्यांनी संयुक्त जनता दलाचे (JDU) माजी नेते शरद यादव यांचीही भेट घेतली. माध्यमांशी बोलताना लालू प्रसादांनी तिसऱ्या आघाडीचा मुद्दा मांडला. तिसरी आघाडी बनवली पाहिजे. यासाठी सुरू असलेली तयारी ही चांगली बाब आहे, असं लालू प्रसाद म्हणाले. लालू प्रसाद यादव यांची अचानक राजकीय सक्रियता वाढली आहे. विरोधी पक्षांची एकजूट करण्याची ही तयारी असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेस कुठेतरी कमी पडत असल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींना आव्हान देण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. यामुळे राजकारणातील हे जुने धुरीण एकत्र आल्याचं बोललं जात आहे. चिराग पासवान यांनी तेजस्वी यादवसोबत येऊन काम करावं, असं आवाहनही लालूंनी केलं.

pm modi : 'पापडी चाट' वक्तव्यावरून PM मोदी नाराज, म्हणाले...

Pawar Meets Lalu: राष्ट्रवादी आगामी उत्तर प्रदेश निवडणूक लढणार, शरद पवार लालूंच्या भेटीला

शरद पवार, लालू प्रसाद यादव आणि मुलायम सिंह यादव या तिघांच्या अनेक गोष्टी समान आहेत. तिघांनीही विद्यार्थी असताना राजकारणात प्रवेश केला होता. तिघेही सामान्य कुटुंबातून आले आहेत. तिघेही राजकारणातील मातब्बर नेते आहेत. विशेष म्हणजे तिघेही मोठ्या राज्यांचे मुख्यमंत्री होते आणि पंतप्रधान होता होता राहिले. तिन्ही नेते आधी काँग्रेसमध्ये आणि नंतर काँग्रेसचे कट्टरविरोधी झाले. आता काँग्रेससोबत आहेत. सोनिया गांधी यांच्या विदेशी वंशाच्या मुद्द्यावरून पवार काँग्रेसमधून बाहेर पडले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना केली. पण नंतर ते आणि त्यांचा पक्ष काँग्रेससोबत आले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज