अ‍ॅपशहर

घुसखोरी रोखण्यासाठी बांधणार लेझरचे कुंपण

पंजाबच्या गुरुदासपूर जिल्ह्यात मोठे दहशतवादी हल्ले झाल्यानंतर केंद्र सरकारने भारत-पाक दरम्यान पंजाबमधून जाणाऱ्या सीमेवर लेझर किरणांच्या मदतीने कुंपण तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. घुसखोर, गुप्तहेर आणि तस्करांना रोखण्यासाठीच लेझरचे कुंपण तयार करणार असल्याची माहिती केंद्र सरकारच्यावतीने देण्यात आली.

Maharashtra Times 28 Apr 2016, 1:32 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम laser walls activated along india pakistan border to plug gaps in vigil
घुसखोरी रोखण्यासाठी बांधणार लेझरचे कुंपण


पंजाबच्या गुरुदासपूर जिल्ह्यात मोठे दहशतवादी हल्ले झाल्यानंतर केंद्र सरकारने भारत-पाक दरम्यान पंजाबमधून जाणाऱ्या सीमेवर लेझर किरणांच्या मदतीने कुंपण तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुदासपूर जिल्ह्यातील एका पोलिस स्टेशनवर तसेच हवाई दलाच्या तळावर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यांमुळे झालेल्या हानीने सीमेवरील बंदोबस्त आणखी कडेकोट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

घुसखोर, गुप्तहेर आणि तस्करांना रोखण्यासाठीच लेझरचे कुंपण तयार करणार असल्याची माहिती केंद्र सरकारच्यावतीने देण्यात आली. जवानांची मोठी तुकडी कार्यरत असली तरी संपूर्ण सीमेचे रक्षण करणे त्यांना अशक्य आहे. त्यामुळे लेझरच्या कुंपणाच्या मदतीने घुसखोरी रोखण्याची सरकारची योजना आहे.

सध्या पंजाबमधून जाणाऱ्या भारत-पाक सीमेवर ८ इन्फ्रारेड आणि लेझर बीम डिटेक्टर बसवण्यात आले आहेत. या यंत्रणेची जबाबदारी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) अखत्यारित आहे.

सीमा सुरक्षा दल पंजाब व्यतिरिक्त जम्मू-काश्मीर, राजस्थान आणि गुजरातमध्ये भारत-पाक दरम्यानच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरील बंदोबस्ताचे काम बघत आहे. बीएसएफने पंजाबमध्ये भारत-पाक सीमेवर लेझरचे कुंपण बांधण्याचा प्रस्ताव २ वर्षांपूर्वीच तयार केला होता. अखेर आता हा प्रस्ताव प्रत्यक्षात अमलात येणार आहे.

लेझरचे कुंपण कार्यरत झाल्यावर घुसखोरी करणे अशक्य होईल, असा विश्वास सीमा सुरक्षा दलातील अधिकारी व्यक्त करत आहेत. इस्रायलसह जगातील अनेक देशांमध्ये घुसखोरांना आळा घालण्यासाठी लेझरच्या पर्यायाचा वापर होत आहे. तिथे मिळणारे यश पाहूनच घुसखोरांना आळा घालण्यासाठी लेझरचे कुंपण तयार करण्याचा प्रस्ताव सीमा सुरक्षा दलाने सरकारपुढे सादर केला आहे.

... तर काय होईल?

लेझरचे कुंपण ओलांडण्याचा प्रयत्न झाला तर अलार्म वाजेल, सीमेवर ज्या भागात अलार्म वाजेल तो भाग प्रखर दिव्यांच्या प्रकाशात उजळेल आणि सीमा सुरक्षा दलाचे शस्त्रधारी जवान घुसखोरांना क्षणार्धात गोळीबार करुन ठार करतील अथवा अटक करतील.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज