अ‍ॅपशहर

नवीन संघचालकही पर्रीकरांवर बरसले

मातृभाषेतून शिक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोव्याचे संघचालक सुभाष वेलिंगकर यांनी बंडाचा झेंडा उभारत स्वतंत्र संघटना स्थापन केली असतानाच, त्यांच्या जागी नुकतीच नियुक्ती झालेले लक्ष्मण बेहरे यांनीही याच मुद्द्यावरून संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर टीका केली.

Maharashtra Times 13 Sep 2016, 5:47 am
भाषेचा मुद्दा नीट न हाताळल्याचा ठपका
महाराष्ट्र टाइम्स.कॉम laxman behere attacks parrikar
नवीन संघचालकही पर्रीकरांवर बरसले


वृत्तसंस्था, पणजी

मातृभाषेतून शिक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोव्याचे संघचालक सुभाष वेलिंगकर यांनी बंडाचा झेंडा उभारत स्वतंत्र संघटना स्थापन केली असतानाच, त्यांच्या जागी नुकतीच नियुक्ती झालेले लक्ष्मण बेहरे यांनीही याच मुद्द्यावरून संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर टीका केली. ‘पर्रीकर हे यशस्वी राजकारणी आहेत, म्हणूनच ते संरक्षणमंत्री आहेत. मात्र गोव्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी शिक्षणाच्या माध्यमाचा मुद्दा योग्यरित्या हाताळला नाही,’ अशी टीका बेहरे यांनी केली. मात्र, पर्रीकर कायम स्वयंसेवक राहतील, असेही बेहरे यांनी लगोलग स्पष्ट केले.

शिक्षणाचे माध्यम हे मातृभाषाच असावे, ही सामान्यांची मागणी आहे आणि संघाचा भारतीय भाषा सुरक्षा मंच आणि शिक्षणाच्या माध्यमाच्या मुद्द्याविषयीच्या भूमिकेला पाठिंबा असल्याचे बेहरे यांनी स्पष्ट केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज