अ‍ॅपशहर

भाजपकडून अखेर मित्रपक्षांना वाटा

विधानसभा निवडणुकीत भाजपला साथ देणाऱ्या मित्रपक्षांना भाजपनं अखेर सत्तेत वाटा दिला आहे. विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी भाजपनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत व शिवसंग्रामचे विनायक मेटे यांची नावं जाहीर केली आहेत. तर, मनसेतून भाजपमध्ये आलेल्या प्रवीण दरेकर यांना संधी देत भाजपमधील अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

Maharashtra Times 30 May 2016, 8:00 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम legislative council election bjp declairs candidate
भाजपकडून अखेर मित्रपक्षांना वाटा

विधानसभा निवडणुकीत भाजपला साथ देणाऱ्या मित्रपक्षांना भाजपनं अखेर सत्तेत वाटा दिला आहे. विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी भाजपनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत व शिवसंग्रामचे विनायक मेटे यांची नावं जाहीर केली आहेत. तर, मनसेतून भाजपमध्ये आलेल्या प्रवीण दरेकर यांना संधी देत भाजपमधील अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीनं आज राज्यसभा सहा व तीन राज्यांतील विधान परिषद निवडणुकीसाठी सहा उमेदवारांची घोषणा केली. पैकी महाराष्ट्र विधान परिषदेतील दोन जागांवर मित्रपक्षांना संधी देण्याचे भाजपनं आधीच ठरवलं होतं. त्यानुसार खोत व मेटे यांची नावं जाहीर करण्यात आली. तिसऱ्या जागेसाठी भाजप प्रवक्ते माधव भंडारी, मनोज कोटक यांची नावं चर्चेत होती. मात्र, त्यांना डावलून मनसेतून भाजपमध्ये आलेले माजी आमदार प्रवीण दरेकर यांना संधी देण्यात आली आहे. निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३१ मे आहे.

विनय सहस्रबुद्धे, एम. जे. अकबर राज्यसभेवर

लोकसभा निवडणुकीपासूनच राज्यसभेसाठी चर्चेत असलेले विनय सहस्रबुद्धे यांना अखेर महाराष्ट्रातून उमेदवारी मिळाली आहे. त्यांच्यासह विकास महात्मे यांचंही नाव जाहीर झालं आहे. याशिवाय, ज्येष्ठ पत्रकार एम. जे. अकबर यांना मध्य प्रदेशातून, शिवप्रताप शुक्ला यांना यूपीतून व महेश पोद्दार यांना झारखंडमधून राज्यसभेत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज