अ‍ॅपशहर

delhi lockdown : दिल्लीत आणखी एक आठवड्याने लॉकडाउन वाढवला

दिल्लीत करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे स्थिती अजूनही चिंतेची आहे. यामुळे राजधानी दिल्लीतील लॉकाडउनमध्ये आणखी एक आठवड्याने वाढ करण्यात आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही माहिती दिली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Apr 2021, 1:23 pm
नवी दिल्लीः दिल्लीत करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एक मोठी घोषणा केली आहे. राजधानी दिल्लीत लॉकडाउन ३ मेपर्यंत वाढवण्यात ( lockdown in delhi extended by a week ) आला आहे. करोनाविरोधी लढाईत लॉकडाउन हा शेवटचा पर्याय आहे. दिल्लीत करोनाचा कहर सुरूच आहे. अजूनही रुग्णसंख्या कमी होत नाहीए. राजधानीत ऑक्सिजनची मोठी समस्या आहे. दिल्लीसाठी ऑक्सिजनचा कोटा ४९० टनांचा आहे. पण अद्यापही पूर्ण पुरवठा होत नाहीए, असं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम arvind kejriwal
दिल्लीत आणखी एक आठवड्याने लॉकडाउन वाढवला


लॉकडाउन वाढवण्यासह राजधानी दिल्ली सुरू असलेले निर्बंधही कायम ठेवण्यात आले आहेत. त्यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. सूट आणि निर्बंध आधीसारखेच कायम राहतील. हॉस्पिटल्सचा ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी एक पोर्टल बनवण्यात आली आहे. यासंबंधी आदेश जारी करण्यात आले आहेत. आम्ही प्रत्येक दोन तासांनी ऑक्सिजन उत्पादक, पुरवठादार आणि हॉस्पिटल्सना ऑक्सिजन साठ्याची काय स्थिती आहे, याची माहिती द्यावी लागणार आहे, असं केजरीवाल यांनी सांगितलं.

दिल्लीत करोना संसर्गाचा दर कमी

दिल्लीत करोना संसर्गाचा दर हा ३६-३७ टक्क्यांपर्यंत गेला होता. पण आज संसर्गाचा दर हा ३० टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासनाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मिळेल तिथून ऑक्सिजन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

pm modi mann ki baat : PM मोदींची 'मन की बात'; 'करोना आपल्या संयमाची परीक्षा घेतोय, दुसऱ्या लाटेने देश हादरला'

केंद्र सरकारकडून ४९० टन ऑक्सिजन अलॉट केला आहे. सध्या ७०० टन आवश्यकता आहे. पण सध्या फक्त ३३० ते ३३५ टन ऑक्सिजन मिळत आहे. सरकारमधील सर्व मंत्री रात्रभर जागून हॉस्पिटल्सना ऑक्सिजनचा पुरवठा करत आहेत. काही ठिकाणी ऑक्सिजन वेळेत पुरवण्यात आम्ही यशस्वी झालो, अशी माहिती केजरीवाल यांनी दिली.

coronavirus india : करोनाने टेन्शन वाढवले! देशात सलग चौथ्या दिवशी ३ लाखांहून अधिक नवीन रुग्ण

महत्वाचे लेख