नवी दिल्ली : आयसीआयसीआय बँकेतील गैरव्यवहारप्रकरणी बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर, त्यांचे पती दीपक आणि व्हिडिओकॉन समूहाचे व्यवस्थापकीय संचालक वेणूगोपाल धूत यांच्याविरुद्ध केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) शुक्रवारी 'लूक आऊट' नोटीस जारी केली आहे. या गैरव्यवहारप्रकरणी या तिघांविरुद्ध काही दिवसांपूर्वी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. व्हिडिओकॉन समूहाला १८७५ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करताना गैरव्यवहार झाल्याचा सीबीआयचा आरोप आहे. कोचर दांपत्य आणि धूत यांच्याविरुद्ध लूक आऊट नोटीस जारी झाल्याने त्यांना आता देश सोडून जाता येणार नाही. जर तसा प्रयत्न केला तर त्यांना इमिग्रेशन अधिकारी अटक करू शकतात.
कोचरविरोधात 'लूक आऊट' नोटीस
आयसीआयसीआय बँकेतील गैरव्यवहारप्रकरणी बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर, त्यांचे पती दीपक आणि व्हिडिओकॉन समूहाचे व्यवस्थापकीय संचालक वेणूगोपाल धूत ...
30 23 Feb 2019, 4:00 am