प्रतापगढ: महाभारतात पांडवांनी द्रौपदीला द्युत खेळत असताना पणाला लावलं होतं. उत्तर प्रदेशच्या प्रतापगढमध्ये असाच काहीसा प्रकार घडला आहे. पती घरात नसताना पत्नी घरमालकासोबत ल्युडो खेळायची. ल्युडो खेळता खेळता तिच्याकडेच पैसे संपले. त्यानंतर तिनं स्वत: पणाला लावलं. घरमालकानं डाव जिंकला आणि महिला पराभूत झाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर उदरनिर्वाहासाठी परराज्यात गेलेला पती माघारी परतला. त्यानं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सोशल मीडियावर एक व्हिडीओ अपलोड केला. तो व्हायरल झाला आहे. मी देवकली (प्रतापगढ) येथील एका घरात भाड्यानं राहतो. ६ महिन्यांपूर्वी तो उदरनिर्वाहासाठी राजस्थानच्या जयपूरमध्ये गेला होता. पती त्याच्या उत्पन्नातील पैसे वाचवून पत्नीला पाठवायचा. त्याच पैशांचा वापर पत्नी घरमालकासोबत ल्युडो खेळायची. पैसे संपल्यानंतर तिनं स्वत:ला पणाला लावलं आणि हरली.
ल्युडो खेळताना झालेला प्रकार पत्नीनं जयपूर आणि दिल्लीत मजुरी करणाऱ्या पत्नीला फोनवर सांगितली. 'मी स्वत:ला ल्युडोमध्ये गमावून बसलेय. आता आमच्या नादाला लागलात तर कापून फेकून देऊ,' अशा भाषेत महिलेनं पतीला धमकीवजा इशारा दिला. महिलेचा पती रामपूर बेल्हाचा रहिवासी आहे. त्याचा विवाह अमेठी जनपदला झाला होता. पत्नीकडून त्याला दोन मुलं आहेत. ल्युडोमध्ये स्वत:ला गमावल्यानंतर पत्नी घरमालकासोबत राहत आहे. मी तिला बरंच समजावलं. पण ती ऐकायला तयार नाही, अशी व्यथा पतीनं मांडली.