अ‍ॅपशहर

तुमच्या मोबाईलमध्येच असेल तुमचे आधारकार्ड

काय, तुम्ही आपले आधार कार्ड सोबत न्यायला विसरता?.ठीक आहे. पण तुम्ही तुमचा फोन सोबत न्यायला तर विसरत नसाल! तर मग अजिबात चिंता करू नका. याचे कारण म्हणजे तुमचे आधारकार्ड आता तुमच्या फोनमध्येच असणार आहे. यामुळे तुम्हाला नेहमी आपले आधारकार्ड सोबत नेण्याची आवश्यकता लागणार नाही. त्यासाठी आधारकार्ड वितरण करणाऱ्या यूनीक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) mAadhar नावाचे मोबाईल अॅप लाँच केले आहे.

Maharashtra Times 19 Jul 2017, 4:40 pm
मटा ऑनलाइन वृत्त। नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम maadhaar now carry aadhaar card on your mobile
तुमच्या मोबाईलमध्येच असेल तुमचे आधारकार्ड


काय, तुम्ही आपले आधार कार्ड सोबत न्यायला विसरता?.ठीक आहे. पण तुम्ही तुमचा फोन सोबत न्यायला तर विसरत नसाल! तर मग अजिबात चिंता करू नका. याचे कारण म्हणजे तुमचे आधारकार्ड आता तुमच्या फोनमध्येच असणार आहे. यामुळे तुम्हाला नेहमी आपले आधारकार्ड सोबत नेण्याची आवश्यकता लागणार नाही. त्यासाठी आधारकार्ड वितरण करणाऱ्या यूनीक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) mAadhar नावाचे मोबाईल अॅप लाँच केले आहे. यामुळे तुमचे आधारकार्ड नेहमीसाठी तुमच्या मोबाईलमध्ये उपलब्ध असणार आहे.

सध्या हे अॅप केवळ अँड्रॉइडसाठीच उपलब्ध आहे. या अॅपद्वारे युजर्सना आपले आधार प्रोफाईल आयडेंटिटी प्रूफप्रमाणे आपल्या फोनमध्ये ठेवता येणार आहे. शिवाय, आधारकार्डाशी संबंधित या अॅपमध्ये किती प्रमाणात आपली बायोमेट्रिक माहिती शेअर करू शकतो हे सुद्धा कंट्रोल करता येणार आहे. याबरोबरच, अॅपच्या आधारे क्यूआर कोडद्वारे आपले प्रोफाइल पाहू शकतो. तसेच ईकेवायसी डिटेल्स शेअर देखील करू शकतो. 'एमआधार' हे अॅप गूगल प्लेस्टोअरमधून डाउनलोड करता येणार आहे. परंतु यासाठी तुम्हाला आधारशी संबधित नंबरची आवश्यकता भासणार आहे.

सध्या या अॅपचे व्हर्जन हे बीटा व्हर्जन असल्याचे UIDAI कडून सांगण्यत आले आहे. याचा अर्थ सध्या या अॅपचा वापर करण्यासाठी काही समस्या उद्भवू शकतात. कारण हे अॅप पूर्णपणे डेव्हलप झालेले नाही. लवकरच या अॅपमध्ये काही अपडेट्स जोडण्यात येणार आहेत. हे अॅप पाहिल्यानंतर काही अडथळे येतात हे जाणवते. प्लेस्टोअरवर देखील युजर्सनी अनेक तक्रारी नोंदवलेल्या आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज