अ‍ॅपशहर

भयंकर! ट्रकची वृद्धाला धडक, शरीराची अक्षरश: चाळण; तुकडे गोळा करायला फोर्कलिफ्ट आणावी लागली

भीषण अपघातात वृद्धाचा मृत्यू झाला. अपघातात वृद्धाच्या मृतदेहाचे अक्षरश: तुकडे झाले. ते गोळा करण्यासाठी फोर्कलिफ्ट आणावी लागली. पोलिसांनी पॉलिथीन पिशव्यांमध्ये तुकडे गोळा केले.

Authored byकुणाल गवाणकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Mar 2023, 1:46 pm
भोपाळ: मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये भीषण अपघात झाला. अंधमूक बायपासजवळ एका ट्रकनं वृद्धाला धडक दिली. त्यात वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की वृद्धाच्या मृतदेहाची अक्षरश: चाळण झाली. मृतदेहाचे तुकडे रस्त्यावर पसरले. ते रस्त्याला चिकटले. तुकडे गोळा करण्यासाठी फोर्कलिफ्ट मागवावी लागली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम road accident


ट्रकच्या धडकेत वृद्धाचा करुण अंत झाला. त्याचे हात, पाय, धड, शिर वेगवेगळे झाले. मृतदेहाचे तुकडे रस्त्यावर पसरले होते. रस्त्यावरील दृश्य पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला. स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी अपघातस्थळी येऊन फोर्कलिफ्ट मागवली. फोर्कलिफ्टच्या माध्यमातून तुकडे गोळा करण्यात आले. ते पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये भरण्यात आले. पोलिसांनी ट्रक चालकाचा शोध सुरू केला आहे.
चौकीदाराला चोर समजून बेदम मारलं; उपस्थित लोक तमाशा पाहत राहिले; शेवट भयंकर झाला
काल सकाळी अंधमूक बायपासजवळ असलेल्या चौकातून जात असलेल्या एका वृद्धाला ट्रकनं धडक दिली. धडक बसल्यानंतर वृद्ध ट्रकमध्ये अडकला. ट्रक त्याला घासत घेऊन गेला. त्यामुळे वृ्द्धाच्या शरीराची अक्षरश: चाळण झाली. अपघात पाहून अनेकांच्या शरीराचा थरकाप उडाला. वृ्द्धाच्या मृतदेहाचे तुकडे झाल्यानं त्याची ओळख पटलेली नाही. अंधमूक बायपास परिसरात अनेक भीषण अपघात झाले आहेत. मात्र तरीही या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.

अपघातासाठी जबाबदार असलेल्या ट्रक चालकाचा शोध घेण्यात अद्याप पोलिसांना यश आलेलं नाही. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मात्र अद्याप तरी पोलिसांना कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. त्यामुळे आरोपी चालकाला पकडण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.
लेखकाबद्दल
कुणाल गवाणकर
महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.... आणखी वाचा

महत्वाचे लेख