अ‍ॅपशहर

३०० किलो कांदा विकून हाती आले फक्त २ रुपये, शेतकऱ्याच्या नशिबी अश्रूच

Onion Farmer: एका कांदा शेतकऱ्याने तब्बल ३०० किलो कांदे विकले. पण, त्याच्या हाती फक्त दोन रुपये आल्याची घटना घडली आहे. यामुळे शेतकरी पुरता निराश झाला आहे. इतक्या मेहनतीने पिकवलेला कांदा शेतकऱ्याला अखेर रडवून गेला.

Authored byनुपूर उप्पल | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Sep 2022, 8:51 pm
भोपाळ: मध्य प्रदेशात कांदा आणि लसूणचं पिक घेणाऱ्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. याचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता की, ३०० किलो कांदा विकून शेतकऱ्याच्या हातात फक्त २ रुपये आले आहेत. हे प्रकरण उज्जैन विभागातील शाजापूर कृषी मंडईचे आहे. सध्या मध्य प्रदेशात कांदा आणि लसूणचे भाव खूपच कमी झाले आहेत. कांद्याला भाव कमी असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Onion Farmer Story
३०० किलो कांदा विकून २ रुपये कमावले


अलीकडेच शाजापूर मंडईत असाच एक प्रकार समोर आला, जो ऐकून आणि पाहून लोक आश्चर्यचकित झाले. भदोनी गावात राहणाऱ्या जयराम या शेतकऱ्याने एका फर्मला ३०० किलो कांदा विकला होता.

हेही वाचा -शेतकरी रोपटं लावत होता, कुदळ मारताच हाती आला ५ व्या शतकातील खजिना

दुकानाचे संचालक अशोक गामी आणि सदाकत यांनी सांगितले की, जयराम कांद्याची ६ पोती घेऊन बाजारात पोहोचला होता. सकाळी तो मार्केटमध्ये पोहोचला तेव्हा त्याने ३०० रुपये आगाऊ घेतले होते. त्यानंतर कांद्याची खरेदी सुरू झाली. त्यांचा कांदा ८० पैसे ते १.२५ रुपये प्रतिकिलो या दरम्यान विकला गेला. अशा प्रकारे कांद्याचे ३३० रुपये त्यांना मिळाले.

या दरम्यान कांदा बाजारात आणण्याचा खर्च आणि वजन आणि हमालीचा खर्च ३२८ रुपये आला. यानंतर जयराम या शेतकऱ्याची अवघी २ रुपयांची बचत झाली. ३०० किलो कांदा विकून शेतकऱ्याला २ रुपये मिळाल्याने शेतकरीही अवाक् झाला. शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने खुद्द व्यापारी देखील चिंतेत आहेत.

हेही वाचा -Signal From Space: अंतराळातून ८२ तासांत जवळपास २००० रहस्यमयी सिग्नल, शास्त्रज्ञांची झोप उडाली...

चांगला कांदा ११ रुपये किलोपर्यंत विकला गेला

मार्केटमध्ये चांगला कांदा ८ ते ११ रुपये किलोने विकला जात आहे. तर मध्यम प्रतीचा कांदा ५ ते ८ रुपये किलोने विकला जात आहे. तर जो कांदा कमी प्रतीचा असेल तो १ रुपये किलोपेक्षा कमी दराने विकला जात आहे. जयरामच्या कांद्याचा दर्जाही अत्यंत खराब होता. कांदा लहान असल्याने ८० पैसे ते सव्वा रुपये किलोने तो विकला गेला.

हेही वाचा -समुद्राच्या पोटात सापडला १३०० वर्ष जुना खजिना, सोनं-चांदी, हिरे, मोती नव्हे; २०० माठांतून निघाल्या वेगळ्याच वस्तू
लेखकाबद्दल
नुपूर उप्पल
नुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा... आणखी वाचा

महत्वाचे लेख