अ‍ॅपशहर

दिग्विजय सिंहना कर्नाटक HC चा धक्का; आता सुप्रीम कोर्टात दाखल केली याचिका

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह हे बेंगळुरूत असलेल्या काँग्रेसच्या बंडखोर आमदारांना भेटण्यावर ठाम आहेत. त्याबाबतची त्यांची याचिका कर्नाटक हायकोर्टाने फेटाळून लावली. आता दिग्विजय यांनी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Mar 2020, 5:58 pm
बेंगळुरू: मध्य प्रदेशात कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात राजकीय लढाई आता शिगेला पोहोचली आहे. या लढाईत काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंह हे भाजपला खुले आव्हान देऊ लागले आहेत. बेंगळुरूत बंडखोर काँग्रेस आमदारांची भेट घेण्यासाठी पोहोचलेल्या दिग्विजय यांना पोलिसांनी आमदारांना भेटू दिले नाही. मात्र दिग्विजय बंगळूरमधील रिसॉर्टमध्ये थांबलेल्या काँग्रेसच्या १६ बंडखोर आमदारांची भेट घेण्यावर ठाम आहेत. त्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, परंतु त्याआधी त्यांना कर्नाटक हायकोर्टाकडून धक्का बसला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम digvijay-singh


कर्नाटक उच्च न्यायालयाने दिग्विजय सिंग यांची याचिका फेटाळून लावली आहे. या याचिकेत दिग्विजय सिंह यांनी बंडखोर आमदारांना भेटण्याची मागणी केली होती. या खटल्याची पुढील सुनावणी आता २६ मार्च रोजी होणार आहे.

मध्य प्रदेश Live: बहुमत चाचणीवर आजही निर्णय नाही, उद्या सुनावणी सुरू राहणार

आपण राज्यसभेचे खासदार असून आपल्याला आमदारांना भेटू द्यावे, असे दिग्विजय यांचे म्हणण आहे. मी आता सर्वोच्च न्यायालय आणि कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करत असून शेवटचा उपाय म्हणून मी धरणे आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्याच्या विचारात असल्याचे दिग्विजय म्हणाले. सध्या तर मी उपोषण करण्याचा निर्णय घेतला असून कोर्टाच्या निर्णयानंतरच मी निर्णय पुढील निर्णय घेईन, असे दिग्विजय म्हणाले.

काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांना बेंगळुरू येथे पोलिसांनी ताब्यात घेतले होते. बंडखोर आमदारांना भेटायला जात असताना पोलिसांनी त्यांना अडवले. ताब्यात असतानाच दिग्विजय सिंग यांनी पोलिस ठाण्यातच उपोषण सुरू केले. त्यावेळी आपल्याला आमदारांना भेटू दिले जात नसून लोकशाहीची हत्या केली जात आहे, असा आरोप त्यांनी केला.

... तर बहुमत चाचणी घटनाविरोधी ठरेल: कमलनाथ

तत्पूर्वी, दिग्विजय सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन भारतीय जनता पक्षाला लक्ष्य केले. दिग्विजय सिंह म्हणाले की, मध्य प्रदेशात भाजप जे काही करत आहे ती लोकशाहीची हत्या आहे. आम्ही मध्य प्रदेशात अत्यंत उत्तम प्रकारे सरकार चालवत होतो, पण ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आमची फसवणूक केली आहे, असा आरोपही त्यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर केला.

बंडखोर आमदारांसदर्भात बोलताना त्यांनी भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केले. भाजपा या सर्व आमदारांना हॉटेल्समध्ये राहण्यासाठी पैसे देत आहे. त्यांच्यावर दबाव आणत आहे, असे आरोप त्यांनी भारतीय जनता पक्षावर केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज