अ‍ॅपशहर

varun gandhi's swipe at kangana ranaut : कंगना राणावतच्या स्वातंत्र्यावरील वक्तव्यावरून भडकले वरुण गांधी; म्हणाले...

अभिनेत्री कंगना राणावत वादात अडकली आहे. देशाच्या स्वातंत्र्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यमुळे कंगना राणावतवर टीका होत आहे. आता भाजप नेते आणि खासदार वरुण गांधी आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी कंगनावर टीका केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Nov 2021, 7:26 pm
नवी दिल्लीः स्वातंत्र्य भीक म्हणून दिले तर ते स्वातंत्र्य ठरते का? भारताला खरे स्वातंत्र्य हे २०१४ ला मिळाले, असं वादग्रस्त वक्तव्य अभिनेत्री कंगना राणावतने केले आहे. यावरून कंगनावर जोरदार टीका होत आहे. भाजपचे नेते आणि खासदार वरुण गांधी यांनी कंगनावर सडकून टीका केली आहे. अशा विचारसरणीला देशद्रोह म्हणायचे की वेडेपणा, असं वरुण गांधी म्हणाले. वरुण गांधी हे काही काळापासून पक्ष नेतृत्वावर नाराज आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Madness or treason; Varun Gandhis swipe at Kangana Ranaut
कंगना राणावतच्या स्वातंत्र्यावरील वक्तव्यावरून भडकले वरुण गांधी; म्हणाले...


कंगना राणावतने केलेल्या वक्तव्यावरून बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी तिच्यावर टीका केली आहे. आता वरुण गांधी यांनीही तिच्यावर टीका केली आहे. एका कार्यक्रमात कंगना राणावत ही गेस्ट स्पिकर म्हणून आली होती. यावेळी कंगना राणावतने भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात वीर सावरकर, राणी लक्ष्मीबाई आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे स्मरण केले. स्वातंत्र्यासाठी रक्त सांडेल, हे याना माहिती होते. पण हिंदुस्तानचे रक्त सांडले जाऊ नये, हे ते जाणून होते. नक्कीच त्यांचा पुरस्कार केला पाहिजे. पण आपल्याला १९४७ ला मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नव्हते. आपल्याला खरे स्वातंत्र्य मिळाले ते २०१४ मध्ये असं, कंगना राणावत म्हणाली.

काय म्हणाले वरुण गांधी?

वरुण गांधी यांनी व्हायरल व्हिडिओ ट्विट केला. आधी महत्मा गांधींचे बलिदान आणि त्यांच्या तपस्येचा अपणान, त्यांची हत्या करणाऱ्याचा सन्मान आणि आता मंगल पांडेंपासून ते राणी लक्ष्मीबाई, भगत सिंग, चंद्रशेखर आझाद नेताजी सुभाषचंद्र बोस आणि इतर लाखो स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचा तिरस्कार केला. या विचारसरणीला देशद्रोह म्हणू की वेडेपणा?, असा टोला वरुण गांधींनी लगावला आहे.

ashok gehlot meets sonia gandhi : सोनिया गांधींनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना दिली तंबी!

'कंगनाचा पद्म श्री पुरस्कार मागे घ्या'

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्तान आवाम मोर्चाचे अध्यक्ष जीतनराम मांझी यांनी कंगना राणावतवर टीका केली आहे. जीतनराम मांझी यांनी ट्विट करत राष्ट्रपती भवनला टॅग केले आहे. कुठलीही दिरंगाई न करता कंगना राणावतला दिलेला पद्म श्री सन्मान मागे घ्यावा. अन्यथा गांधी, नेहरू, भगत सिंग, सरदार पटेल, कलमा, मुखर्जी, वीर सावकर यांनी स्वातंत्र्यासाठी भीक मागितली, असा याचा अर्थ निघेल. कंगनाने आपल्या वक्तव्यावरून माफी मागावी. टीव्ही चॅनेल्स आणि मीडियानेही कंगनावर बंदी घालावी, अशी मागणी मांझी यांनी केली आहे. कंनाचा अलिकडेच पद्म श्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

hindutva issue : 'सोनिया आणि राहुल गांधींच्या इशाऱ्यावरून हिंदूंचा केला जातोय अपमान'

महत्वाचे लेख