अ‍ॅपशहर

पत्रकार रवीश कुमार यांना मॅगसेसे पुरस्कार

पत्रकार रवीश कुमार यांना यंदाचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार सोमवारी येथे प्रदान करण्यात आला. रॅमन मॅगसेसे पुरस्कार हा आशियाचा नोबेल पुरस्कार मानला जातो. रवीश कुमार एनडीटीव्ही इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी संपादक आहेत.

Maharashtra Times 10 Sep 2019, 2:00 am
वृत्तसंस्था, मनीला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ravish-kumar


पत्रकार रवीश कुमार यांना यंदाचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार सोमवारी येथे प्रदान करण्यात आला. रॅमन मॅगसेसे पुरस्कार हा आशियाचा नोबेल पुरस्कार मानला जातो. रवीश कुमार एनडीटीव्ही इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी संपादक आहेत.

वास्तववादी वार्तांकन करण्याकडे कारकीर्दीच्या सुरुवातीपासूनच रवीश कुमार यांचा कल राहिला आहे. सर्वसामान्यांचे सहसा प्रसारमाध्यमांकडून दखल न घेतले जाणारे प्रश्न मांडणे यावर त्यांचा भर राहिला आहे. पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले, भारतीय प्रसारमाध्यमे सध्या कठीण काळातून जात आहेत. अशी परिस्थिती केवळ योगायोगाने आलेली नाही, तर ती टप्प्याटप्प्याने आणि नियोजित पद्धतीने आलेली आहे. या कठीण काळाचे मूल्यमापन करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

रॅमन मॅगसेसे पुरस्काराचे मानकरी -

- रवीश कुमार, भारत

- को स्वे विन, म्यानमार

- अँगखाना नीलापैजित, थायलंड

- रेमुण्डो पुंजान्ते कायाब्याब, फिलिपाइन्स

- किम जो की, दक्षिण कोरिया

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज