अ‍ॅपशहर

praful patel : शरद पवार, अमित शहा भेटीच्या चर्चांवर प्रफुल्ल पटेल बोलले...

अहमदाबादमध्ये शरद पवार आणि अमित शहा यांची गुप्त बैठक झाल्याचं वृत्त एका गुजराती वृत्तपत्राने दिलं होतं. त्यावरून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारबाबत जोरदार चर्चा रंगली होती. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Mar 2021, 9:19 am
नवी दिल्लीः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( sharad pawar ) आणि प्रफुल्ल पटेल ( praful patel ) यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा ( amit shah ) यांची भेट घेतल्याची रविवारी जोरदार चर्चा होती. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम praful patel
शरद पवार, अमित शहा भेटीच्या चर्चांवर प्रफुल्ल पटेल बोलले...


राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत युती करणार असल्याच्या वृत्ताचा प्रफुल्ल पटेल यांनी इन्कार केला आहे. उद्धव ठाकरे ( cm thackeray ) यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार स्थिर आणि सुरक्षित आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार मोट शरद पवारांनी बांधली. अशा वृत्तांमध्ये काहीही अर्थ नाहीए, असं प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलंय.

प्रफुल्ल पटेल यांच्या या स्पष्टीरणापूर्वी रविवारी दिल्ली पत्रकार परिषदे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांनी सूचक वक्तव्य केलं होतं. सर्वकाही जाहीर करायचं नसतं, असं अमित शहा म्हणाले होते. यामुळे शहा आणि पवार यांची भेट झाल्याच्या चर्चेला पुन्हा उधाण आलं होतं.

amit shah : महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? शरद पवारांच्या भेटीवर अमित शहांचं सूचक वक्तव्य

यापूर्वी महाराष्ट्रातील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही अशा प्रकारची कुठलीही भेट झाली नसल्याचं स्पष्ट केलं होतं. जाणून बुजून हे वृत्त पसरवल्याचा आरोप मलिक यांनी केला.

amit shah : फोन टॅप कुणी आणि का केला? अमित शहांचा सवाल

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज