अ‍ॅपशहर

मलेशियाचे पंतप्रधान मोदींआधी रजनीकांतला भेटणार

राजकारणी आणि अभिनेत्यांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी भलेही जगभरातील लोक उत्सूक असतील पण दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतचा जलवा अजूनही कायम आहे. आता हेच पहा ना, मलेशियाचे पंतप्रधान नजीब रजाक भारताच्या दौऱ्यावर आज येत असून या दौऱ्यात ते पंतप्रधान मोदी यांना भेटण्याआधी अभिनेता रजनीकांतला भेटणार आहेत. त्यासाठी रजाक यांचं विमान थेट चेन्नईला रवाना होणार आहे.

Maharashtra Times 30 Mar 2017, 9:00 am
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम malaysia pm najib razak may meet superstar rajinikanth
मलेशियाचे पंतप्रधान मोदींआधी रजनीकांतला भेटणार

राजकारणी आणि अभिनेत्यांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी भलेही जगभरातील लोक उत्सूक असतील पण दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतचा जलवा अजूनही कायम आहे. आता हेच पहा ना, मलेशियाचे पंतप्रधान नजीब रजाक भारताच्या दौऱ्यावर आज येत असून या दौऱ्यात ते पंतप्रधान मोदी यांना भेटण्याआधी अभिनेता रजनीकांतला भेटणार आहेत. त्यासाठी रजाक यांचं विमान थेट चेन्नईला रवाना होणार आहे.

मलेशियाचे पंतप्रधान नजीब रजाक आजपासून पाच दिवसाच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. ४ एप्रिलपर्यंत ते भारतात थांबणार आहेत. आज सर्वात आधी ते चेन्नईत उतरणार आहेत. चेन्नईत आधी रजनीकांत यांची भेट घेऊन नंतरच ते मोदींना भेटणार आहेत.

म्हणून रजनीकांतला भेटणार

रजाक यांच्या रजनीकांत भेटीमागे दोन महत्त्वाची कारणे आहेत. एक म्हणजे रजाक आणि त्यांची पत्नी रजनीकांतचे जबरदस्त फॅन आहेत. त्यामुळे त्यांना रजनीकांतला भेटायचे आहे. दुसरे कारण म्हणजे यावर्षी मलेशियात निवडणुका होत आहेत. रजाक यांना पुन्हा निवडणुकीला उभे राह्यचे आहे. मलेशियात भारतीय वंशाचे २७ लाख लोक असून हे सर्व मतदार आहेत. म्हणजे मलेशियातील मतदारांच्या एकुण संख्येच्या ७ ते ८ टक्के मतदार हे भारतीय आहेत. विशेष म्हणजे या भारतीय मतदारांवर रजनीकांतचे गारूड असल्याने रजनीकांत यांची भेट घेऊन हे मतदान आपल्याकडे वळवण्याचा रजाक यांचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळेच त्यांनी मोदींच्याही आधी रजनीकांत यांची भेट घेण्याचा निर्णय घेतल्याचं सुत्रांनी सांगितलं. आज रजनीकांत यांची भेट घेतल्यानंतर रजाक हे शुक्रवारी दिल्लीत जातील. त्यानंतर शनिवारी मोदींना भेटतील. या भेटीत ते मोदींबरोबर संरक्षण करार करतील.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज