अ‍ॅपशहर

‘ममता बॅनर्जी म्हणजे राक्षसीण’

'पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आधुनिक काळातील झाशीची राणी आहेत,' अशा शब्दांत तृणमूल काँग्रेसने स्तुतिसुमने उधळल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री गिरीराजसिंह यांनी ममता यांची तुलना राक्षसीणिशी केली आहे.

PTI 9 Feb 2019, 4:00 am
नवी दिल्ली, वृत्तसंस्था
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mamta-banerjee


'पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आधुनिक काळातील झाशीची राणी आहेत,' अशा शब्दांत तृणमूल काँग्रेसने स्तुतिसुमने उधळल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री गिरीराजसिंह यांनी ममता यांची तुलना राक्षसीणिशी केली आहे. ममता यांनी पश्चिम बंगालची वाट लावली आहे, असा टोलाही त्यांनी हाणला आहे. झाशीची राणी शूर होती. तिची तुलना तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष असलेल्या ममतांची करणे म्हणजे राणीचा घोर अपमान आहे. आपल्याविरुद्ध बोलणाऱ्या व्यक्तीचा खून करण्यापर्यंत मजल गेलेल्या ममतांची तुलना झाशीच्या राणीशी किंवा राणी पद्मावतीशी करणे अपमानास्पद आहे. ममतांनी बंगाल उद्ध्वस्त केला, तर झाशीची राणी आपल्या राज्यासाठी प्राणपणाने लढली हा फरक आहे, असे गिरीराजसिंह म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज