अ‍ॅपशहर

प्रसाद बनवताना हाहा:कार, स्वयंपाकी उकळत्या लाप्शीत पडला; घटना सीसीटीव्हीत कैद

man dies of burn injuries after falling into pot of boiling porridge: तमिळनाडूच्या मदुराईमध्ये एक व्यक्ती कढईत पडला. त्यावेळी कढईत प्रसाद तयार केला जात होता. लाप्सी उकळत असताना व्यक्ती कढईत पडला. ही घटना २९ जुलैला घडली. त्या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुथू कुमार असं कढईत पडलेल्या व्यक्तीचं नाव आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Aug 2022, 3:41 pm
मदुराई: तमिळनाडूच्या मदुराईमध्ये एक व्यक्ती कढईत पडला. त्यावेळी कढईत प्रसाद तयार केला जात होता. लाप्सी उकळत असताना व्यक्ती कढईत पडला. ही घटना २९ जुलैला घडली. त्या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुथू कुमार असं कढईत पडलेल्या व्यक्तीचं नाव आहे. दुर्घटनेत मुथू कुमार ६५ टक्के भाजले. ४ दिवसांनंतर २ ऑगस्टला त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम man falls
लाप्सी उकळत असताना कढईत पडून एकाचा मृत्यू


तमिळनाडूत सध्या आडी वेल्लीचा नावाचा उत्सव सुरू आहे. उत्सव काळात मोठ्या प्रमाणात लाप्सी तयार केली जाते आणि भाविकांमध्ये तिचं वाटप केलं जातं. २९ जुलैला मदुराईतील पजहनगनाथममध्ये स्थानिक लोक प्रसादासाठी लाप्सी तयार करत होते. मुथू कुमार त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीनं मुथू मरियम्मम मंदिरातील भाविकांसाठी प्रसाद तयार करत होते. मोठमोठ्या भांड्यांमध्ये लाप्सी तयार केली जात होती. तितक्यात मुथू यांना थोडी भोवळ आली. त्यांना स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न केला.
वॉचमननं टेरेसवरून फेकलं; पण १८ व्या मजल्यावर चमत्कार घडला; तरुणीसोबत नेमकं काय झालं
घटनास्थळी असलेल्या एका सीसीटीव्हीत संपूर्ण प्रसंग रेकॉर्ड झाला. मुथू यांना भोवळ आल्याचं फुटेजमध्ये दिसत आहे. त्यांनी स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न केला. ते एका कढईजवळ गेले. तितक्यात त्यांचा तोल गेला आणि ते कढईत पडले. यानंतर आसपास एकच खळबळ माजली. कढईत अतिशय गरम होती. त्यात लाप्सी उकळत होती. त्यामुळे मुथू यांना बाहेर काढण्यात अडचणी आल्या. मुथू यांना बाहेर काढेपर्यंत ते ६५ टक्के भाजले होते. त्यांना राजाजी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
बिल्डिंगमधील 'महिला' पॉर्न पाठवायची, १० शेजाऱ्यांनी मैत्री केली अन् पायाखालची जमीन सरकली
मुथू कुमार अतिशय थकलेले होते. त्यांना भोवळ येत होती. आपण जमिनीवर कोसळू नये यासाठी ते आधार शोधत होते. शुद्ध हरपत चालल्यानं आपण कशाचा आधार घेत आहोत हे त्यांच्या लक्षात आलं नाही. स्वत:ला सावरण्यासाठी ते कढईजवळ गेले. आसपासच्या लोकांचं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं. मुथू कढईत पडताच सगळ्यांची धावाधाव झाली. कढईत लाप्सी असल्यानं मुथू यांना बाहेर काढण्यासाठी ती पालथी करावी लागली.

महत्वाचे लेख