अ‍ॅपशहर

धक्कादायक! पेपर वाचतानाच मृत्यूने गाठलं, काळजाचा ठोका चुकावणारा VIDEO समोर...

Viral News Today : सोशल मीडियावर एका धक्कादायक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये एका व्यक्तीचा चक्क पेपर वाचत असताना मृत्यू झाला आहे. सगळ्यात गंभीर म्हणजे याचा व्हिडिओदेखील समोर आल्याने नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण आहे.

Edited byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Nov 2022, 9:23 am
बारमेर : सोशल मीडियावर काय व्हायरल होईल याचा काही नेम नसतो त्यामध्ये अनेक व्हिडिओ मनोरंजक असतात पण काही व्हिडिओ मात्र मनसुल न करणारे असतात असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होतोय या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती पेपर वाचत असताना अचानक जमिनीवर कोसळला आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम viral news today


हा धक्कादायक व्हिडिओ राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यातील असल्याचं बोललं जातं आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बेंचवर बसून वर्तमानपत्र वाचण्यासाठी बसले होते. पण पेपर वाचत असतानाच त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले. तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता कशाप्रकारे त्यांच्यासोबत ही घटना घडली तर या दरम्यान त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे.


व्यक्तीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, तोपर्यंत डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. योगायोगाने ही घटना सीसीटीव्ही कॅमेरा कैद झाली आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख