अ‍ॅपशहर

गाडी हटवण्यावरुन वाद, घरापर्यंत पाठलाग, मग तिघांवर थेट कार चढवली; दोघांनी भाऊ गमावला

Uttar Pradesh News: दीपू गौतम नावाचा तरुण शनिवारी रात्री उशिरा दोन भावांसह देवी जागरण येथून परतत होता. अलीगंज गल्ला मंडीजवळील चहाच्या दुकानात गाडी हटवण्याच्या मुद्द्यावरून त्यांचा काही तरुणांशी वाद झाला, त्यानंतर हे तिघेही भाऊ घराकडे निघाले. वाटेत त्यांना त्या तरुणांनी पाठलाग करून घेराव घातला, त्यानंतर चर्चा करुन दोन्ही बाजूंमध्ये तडजोड करण्यात आली.

Authored byनुपूर उप्पल | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Dec 2022, 9:25 am
लखनऊ: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये रविवारी एका चहाच्या दुकानात किरकोळ कारणावरून काही तरुणांमध्ये वाद झाला. या वादानंतर कारमधील तरुणांनी इतर तीन तरुणांचा त्यांच्या घरापर्यंत पाठलाग केला. तेथे तडजोड करण्याच्या नावाखाली पंचायत बसवून सुमारे तासभर चर्चाही चालली, त्यानंतर सर्वजण त्यांच्यात्यांच्या घरी जात असताना एका तरुणाने त्या तीन तरुणांवर थेट कार घातली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला, तर इतर दोनजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Lacknow Crime News


नेमका वाद काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपू गौतम नावाचा तरुण शनिवारी रात्री उशिरा दोन भावांसह देवी जागरण येथून परतत होता. अलीगंज गल्ला मंडीजवळील चहाच्या दुकानात गाडी हटवण्याच्या मुद्द्यावरून त्यांचा काही तरुणांशी वाद झाला, त्यानंतर हे तिघेही भाऊ घराकडे निघाले. वाटेत त्यांना त्या तरुणांनी पाठलाग करून घेराव घातला, त्यानंतर चर्चा करुन दोन्ही बाजूंमध्ये तडजोड करण्यात आली.

हेही वाचा -मगर आली अन् एका झटक्यात चिमुकल्याला पाण्यात घेऊन गेली, दुर्दैवी वडील बघतच राहिले

एका तरुणाचा मृत्यू, २ जखमी

मध्यरात्री तडजोड झाल्यानंतर पहाटे चारच्या सुमारास सर्वजण आपआपल्या घरी जाण्यास निघाले असताना एका तरुणाने भरधाव वेगात दीपू आणि त्याच्या भावांवर कार चढवली. यामध्ये ते तिघेही जखमी झाले. ज्यानंतर तात्काळ त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे दीपूचा मृत्यू झाला. तर किरकोळ जखमी झालेल्या दोन्ही तरुणांवर प्राथमिक उपचार करण्यात आले.

दीपूच्या नातेवाइकांना माहिती मिळताच त्यांनी मृतदेह रस्त्यावर ठेवून रास्तारोको केला, घोषणाबाजीही केली. पोलिसांनी तासभर समजावण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्याचं मान्य केले.

हेही वाचा -चार चौघात उधारीचे पैसे मागितले, तिघांनी तरुणाला संपवलं, साडीत गुंडाळून प्लास्टिकमध्ये भरलं अन्

आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला

कुटुंबीयांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करुन आरोपींचा शोध सुरु आहे. ऋषभ श्रीवास्तव या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. उर्वरित दोन जणांच्या शोधासाठी छापेमारी सुरु आहे. त्यालाही लवकरच अटक करण्यात येईल. डीसीपी नॉर्थ एसएम कासिम अब्दी यांनी सांगितले की, वाहन क्रमांकाच्या आधारे त्रिवेणीनगर येथील साहिल सोनकर, त्याचा साथीदार ऋषभ श्रीवास्तव, अतुल यांच्यासह अज्ञात लोकांविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न आणि एससी-एसटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा -हडपसरमध्ये खाजगी ट्रॅव्हल्स आणि पीएमटीची समोरासमोर धडक, गाड्यांची स्थिती पाहून धडकी भरेल...
लेखकाबद्दल
नुपूर उप्पल
नुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा... आणखी वाचा

महत्वाचे लेख