अ‍ॅपशहर

एका रात्रीत दुसऱ्यांदा ठेवायचे होते शरीरसंबंध, पत्नीचा नकार; पतीनं केला भयंकर प्रकार

उत्तर प्रदेशच्या अमरोहामधील ३० वर्षीय व्यक्तीनं पत्नीची हत्या केली. एका रात्रीत दोनवेळा शरीर संबंध ठेवण्यास नकार दिल्यानं पतीनं पत्नीला गळा आवळून संपवलं. पत्नीची हत्या करून त्यानं मृतदेह ५० किमी दूर फेकला आणि पोलिसांकडे पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. मात्र पोलिसांना त्याच्यावर संशय आला. आरोपी मोहम्मद अन्वरनं पोलिसांकडे हत्येची कबुली दिली आहे.

Authored byकुणाल गवाणकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Dec 2022, 9:51 am
बरेली: उत्तर प्रदेशच्या अमरोहामध्ये एका ३० वर्षीय तरुणानं पत्नीची हत्या केली आहे. एका रात्रीत दोनदा शरीर संबंध ठेवण्यास नकार दिल्यानं पतीनं पत्नीला संपवलं. आरोपी मोहम्मद अन्वरनं पोलिसांकडे हत्येची कबुली दिली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम up crime


सोमवारी रात्री मोहम्मदनं त्याच्या पत्नीला झोपेतून उठवलं. त्याला शरीरसंबंध ठेवायचे होते. पत्नीनं तयारी दर्शवली. यानंतर थोड्या वेळानं मोहम्मदनं पुन्हा पत्नीकडे शरीरसंबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी पत्नीनं नकार दिला. त्यामुळे मोहम्मद संतापला. त्यानं दोरीच्या मदतीनं पत्नीचा गळा आवळून खून केला.
भयंकर! टीसीच्या डोक्यावर पडली हायव्होल्टेज तार; प्लॅटफॉर्मवर कोसळला, ट्रॅकवर उलटा पडला
मोहम्मदनं पत्नीचा मृतदेह पॉलिथिनच्या गोणीत भरला आणि घरापासून ५० किलोमीटर अंतरावर फेकला. यानंतर त्यानं पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली. मंगळवारी पोलिसांना ठाकूरद्वार येथील रातुपुरा गावाजवळ एका अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. महिलेचे फोटो त्यांनी आसपासच्या पोलीस ठाण्यात पाठवले.
क्रिकेट मॅचमध्ये १ रनसाठी धावला, मैदानात कोसळला; मित्रांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण...
मृत महिलेचे फोटो पाहून अमरोहा पोलिसांनी ठाकूरद्वार पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. यानंतर पोलिसांनी मोहम्मद अन्वरला मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बोलावलं. पोलिसांना अन्वरबद्दल संशय आला. त्यांनी त्याची चौकशी सुरू केली. त्यात अन्वरनं हत्येची कबुली दिली.

रुखसार असं मृत महिलेचं नाव असून तिचा अन्वरशी २०१३ मध्ये विवाह झाला होता. अन्वर आणि रुखसार यांना ३ मुलं आहेत. अन्वरची त्याच्या घराच्या तळमजल्यावर बेकरी आहे. अन्वरचं कुटुंब पहिल्या मजल्यावर वास्तव्यास आहे.
लेखकाबद्दल
कुणाल गवाणकर
महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.... आणखी वाचा

महत्वाचे लेख