अ‍ॅपशहर

मुंबईकर तरुणानं महिलेला संपवलं, मांस खाल्लं; आता भयंकर सत्य समोर; जगातलं पहिलंच प्रकरण

मुंबईहून गेलेल्या तरुणानं जयपूरच्या पाली जिल्ह्यात एका वृद्धेची दगडानं ठेचून हत्या केली. त्यानंतर त्यानं महिलेच्या चेहऱ्याचं मांस खाल्लं. ग्रामस्थांनी त्याला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं.

कुणाल गवाणकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 May 2023, 7:54 pm
जयपूर: राजस्थानच्या पालीमध्ये एका तरुणानं महिलेची हत्या करुन तिच्या चेहऱ्याचं मांस खाल्ल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. सुरेंद्र नावाच्या तरुणानं २६ मे रोजी एका वृद्ध महिलेची जंगलात दगडानं ठेचून हत्या केली. त्यानंतर त्यानं महिलेच्या चेहऱ्याचं मांस खाल्लं. त्यामुळे आरोपी तरुणाचा चेहरा रक्तानं माखला. ग्रामस्थांनी तरुणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम crime news


आरोपी तरुणाला हायड्रोफोबिया नावाचा आजार झाला होता. त्याच्या शरीरात सायकोसिसची लक्षणंदेखील दिसली होती. या आजारात माणूस हिंसक होतो. याबद्दल पाली मेडिकल कॉलेजचे सहप्राचार्य डॉ. प्रवीण गर्ग यांनी महत्त्वाची माहिती दिली. 'वृद्ध महिलेचं मांस खाणारा आरोपी हायड्रोफोबिया आजारानं पीडित होता. रेबिजग्रस्त कुत्रा चावल्यानंतर माणसाला हा आजार होतो. सात ते दहा दिवसांत माणसाला या आजाराची लागण होते,' अशी माहिती गर्ग यांनी दिली.
भयंकर! ग्रामस्थांनी महिलेची साडी खेचली, गावभर फिरवलं; पतीचा गावकऱ्यांसोबत डान्स
हायड्रोफोबियाचा रुग्ण हवा, पाणी आणि प्रकाशाला घाबरतो. आम्ही रुग्णाची तपासणी केली, त्याचं निरीक्षण केलं. त्याला पाणी प्यायला दिल्यावर तो वारंवार ते फेकून देत होता. तो उजेडालादेखील घाबरत होता. यालाच हायड्रोफोबिया म्हणतात. वेडा झालेला कुत्रा चावल्यावर हायड्रोफोबियाची लागण होते. आरोपी तरुण मुंबईत काम करत होता. तो नेमका कशासाठी राजस्थानला गेला होता, त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
पाहुण्याचा मुक्काम वाढला, तरुण वैतागला; जीव द्यायला झाडावर, पोलिसांनी उतरवल्यावर म्हणतो...
हवा, पाणी आणि उजेडाला घाबरणं हीच हायड्रोफोबियाची मुख्य लक्षणं असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या आजारावर उपचार नाहीत. एखाद्याला हायड्रोफोबियाची लागण झाल्यास १० ते ११ दिवसांत त्याचा मृत्यू होतो. या आजारानं मेंदूवर परिणाम होतो. हायड्रोफोबिया फ्युरियस रेबिज झाल्याच्या दोनच घटना जगात घडल्या आहेत. मात्र यामुळे एखाद्यानं जीव घेतल्याचा हा पहिलाच प्रकार आहे. त्यामुळे हा प्रकार पूर्णपणे वेगळा आहे, असं गर्ग म्हणाले.
लेखकाबद्दल
कुणाल गवाणकर
महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.... आणखी वाचा

महत्वाचे लेख