अ‍ॅपशहर

शर्मिला इरोम विवाहबद्ध होणार

मणिपूरमधून आर्म्ड फोर्सेस कायदा रद्द करण्यात यावा यासाठी अनेक वर्षे उपोषण करणारी कार्यकर्ती शर्मिला इरोम या त्यांचा ब्रिटिश जोडीदार डेस्मंड कौटिन्हो यांच्याशी येत्या १६ ऑगस्टला कोडाईकॅनालमध्ये नोंदणी पद्धतीने विवाहबद्ध होणार आहेत.

Maharashtra Times 10 Aug 2017, 2:27 am
चेन्नई : मणिपूरमधून आर्म्ड फोर्सेस कायदा रद्द करण्यात यावा यासाठी अनेक वर्षे उपोषण करणारी कार्यकर्ती शर्मिला इरोम विवाहबद्ध होणार आहेत. मागील अनेक वर्षांपासून त्यांच्याबरोबर असणारे त्यांचे ब्रिटिश जोडीदार डेस्मंड कौटिन्हो यांच्याशी येत्या १६ ऑगस्टला त्या विवाहबद्ध होतील.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम manipuri activist irom sharmila set to register marriage
शर्मिला इरोम विवाहबद्ध होणार


शर्मिला आणि डेस्मंड मागील अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. शर्मिला यांच्या लढ्यात डेस्मंड कायमच त्यांच्या पाठीशी राहिले आहेत. या भावी दांपत्याने थाटामाटात लग्न करण्याऐवजी नोंदणी पद्धतीने विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच येत्या बुधवारी (१६ ऑगस्ट) रोजी हे दोघे कोडाईकॅनालमध्ये नोंदणी पद्धतीने विवाहबद्ध होणार आहेत.

या दोघांनी कोडाईकॅनॉलमध्ये त्यांनी घर खरेदी केले असून विवाहानंतर दोघे तिथेच स्थायिक होणार आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज