अ‍ॅपशहर

मणिपुरी तरुणीचा दिल्लीत वांशिक छळ

येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील इमिग्रेशन अधिकाऱ्याने आपला वांशिक छळ केल्याचा आरोप एका मणिपुरी तरुणीने केला आहे. या प्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी चौकशीचे आदेश दिले असून, दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे.

Maharashtra Times 12 Jul 2016, 2:01 am
नवी दिल्ली : येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील इमिग्रेशन अधिकाऱ्याने आपला वांशिक छळ केल्याचा आरोप एका मणिपुरी तरुणीने केला आहे. या प्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी चौकशीचे आदेश दिले असून, दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम manipuri girl molested in delhi
मणिपुरी तरुणीचा दिल्लीत वांशिक छळ


मोनिका खांगेमबाम ही तरुणी एका परिषदेनिमित्त सोल येथे जाण्यासाठी शनिवारी रात्री ९ च्या सुमारास दिल्ली विमानतळावर पोहोचली. त्यावेळी तिथे असलेल्या एका इमिग्रेशन अधिकाऱ्याने आपला वांशिक छळ केल्याचा आरोप मोनिकाने केला आहे. या घटनेविषयी तिने तिच्या फेसबुक वॉलवर लिहिले आहे. ती म्हणते, ‘मी इमिग्रेशन डेस्कवर गेले तेव्हा तेथील अधिकारी माझा पासपोर्ट पाहत म्हणाला, ‘तुम्ही भारतीय तर वाटत नाही.’ त्यानंतर माझ्याकडे पाहून छद्मी हास्य करून त्याने मला ‘भारतात किती राज्ये आहेत,’ असा प्रश्न केला. तेव्हा त्याच्या बाजूच्या काऊंटरवरील महिला अधिकारी ‌फिदीफिदी हसली. त्यावर मी त्याला मणिपूरची असल्याचे सांगितले तेव्हा त्याने मला मणिपूरला लागून असलेल्या राज्यांची नावे विचारली. अखेर मला उशीर होत असल्याचे सांगताच, तो अधिकारी म्हणाला, ‘विमान तुम्हाला सोडून कुठे जाणार नाही. आरामात उत्तर द्या.’

मोनिकाची ही फेसबुक पोस्ट व्हायरल झाल्यानंतर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विट करून खेद व्यक्त केला आणि या प्रकरणी आपण राजनाथसिंह यांच्याशी बोलणार असल्याचे नमूद केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज