अ‍ॅपशहर

पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात'चे उद्या अर्धशतक

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुन्हा एकदा 'मन की बात' या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. उद्याच्या 'मन की बात' या कार्यक्रमाला एक वेगळे महत्व असून २०१४ साली सुरू झालेल्या या कार्यक्रमाचा उद्या ५० वा भाग असणार आहे. पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी हे प्रत्येक महिन्याच्या अखेरच्या रविवारी 'मन की बात' या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधतात.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Nov 2018, 10:49 pm
नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुन्हा एकदा 'मन की बात' या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. उद्याच्या 'मन की बात' या कार्यक्रमाला एक वेगळे महत्व असून २०१४ साली सुरू झालेल्या या कार्यक्रमाचा उद्या ५० वा भाग असणार आहे. पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी हे प्रत्येक महिन्याच्या अखेरच्या रविवारी 'मन की बात' या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१४ पासून पद सांभाळल्यानंतर त्याच वर्षी ऑक्टोबरपासून या कार्यक्रमाला सुरुवात केली आहे. देशातील जनतेशी रेडिओच्या माध्यमातून ते संवाद साधतात. मोदी केवळ मन की बात करीत नाही तर लोकांनी पाठवलेल्या सूचना आणि त्यांचे विचार ऐकूण घेतात. या सूचना आणि विचारांना कार्यक्रमात सहभागी करुन घेतले जाते. मोदींनी २०१४ साली 'मन की बात' या कार्यक्रमातून लोकांना खादी परिधान करण्याचे आवाहन केले होते. मोदींच्या या आवाहनाला देशभरातून उदंड प्रतिसाद मिळाला होता. एका महिन्यात १२५ टक्के खादीच्या विक्रीत वाढ झाली होती. २०१५ साली भारत-पाकिस्तान युद्धाला ४० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त शहीद वीर जवानांना शौर्यांजली, सेल्फी विथ डॉटर, मुली वाचवा या अभियानाला, एलपीजी सबसिडी सोडण्याच्या आवाहनाला, स्वच्छता अभियानाला जनतेने उत्तम प्रतिसाद दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबतही 'मन की बात' केली होती. याची खूप चर्चा झाली होती. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत संयुक्तपणे मोदींनी 'मन की बात' केल्यानंतर जगभरातील कोट्यवधी लोकांनी हा कार्यक्रम पाहिला होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज