अ‍ॅपशहर

utpal parrikar : मनोहर पर्रीकरांच्या पुत्राचा भाजपला इशारा; म्हणाले, 'पणजीतून उमेदवारी न दिल्यास...'

गोव्यात पुढच्या वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस या पक्षांनी तयारी सुरू केली आहे. सत्ताधारी भाजपनेही विविध पातळ्यांवरून तयारी सुरू केली आहे. निवडणुकीची तयारी सुरू असताना गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी भाजपला इशारा दिला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Nov 2021, 6:50 pm
पणजीः गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी भाजपला इशारा दिला आहे. पणजीतून विधानसभेचे तिकीट न दिल्यास कठोर निर्णय घेण्या भाग पाडू नका, असा इशारा त्यांनी दिला आहे. आपल्याला येथूनच तिकीट मिळेल, असा ‘पूर्ण विश्वास’ असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांचे वडील दिवंगत मनोहर पर्रीकर यांनी २५ वर्षे पणजीचे प्रतिनिधित्व केले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम manohar parrikar son utpal parrikar warns bjp on election ticket
मनोहर पर्रिकरांच्या पुत्राचा भाजपला इशारा; म्हणाले, 'पणजीतून उमेदवारी न दिल्यास...'


आपण पक्षाला आधीच सांगितले आहे. मला पणजीतून निवडणूक लढवायची आहे. पक्ष मला तिकीट देईल, याची मला खात्री आहे, असे उत्पल पर्रीकर म्हणाले. सध्या येथील अंटानासिओ मोन्सेरटो हे आमदार आहेत. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत ते येथून विजयी झाले आणि नंतर भाजपमध्ये दाखल झाले.

तिकीट न मिळाल्यास काय करणार? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. मला सध्या या विषयावर बोलण्याची गरज नाही. मनोहर पर्रीकर यांना आयुष्यात सहजासहजी काही मिळाले नाही. त्याचप्रमाणे मलाही हव्या असलेल्या गोष्टींसाठी खूप मेहनत करावी लागेल. कठोर निर्णय घेण्यास आपल्याला भाग पाडले जाऊ शकते. असे निर्णय घेण्याचे बळ मिळो, हीच प्रार्थना. जेव्हा निर्णय घेण्याची वेळ येईल तेव्हा मी जनतेचे ऐकेन. मी पक्षाला सांगितले आहे. पक्ष मला तिकीट देईल, याची मला खात्री आहे, असे उत्पल पर्रीकर म्हणाले.

priyanka gandhi : प्रियांका गांधींवर कविता चोरीचा गंभीर आरोप; 'तुमच्या घाणेरड्या राजकारणासाठी कविता नाही'

या प्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंदशेठ तानावडे यांना विचारण्यात आले. 'पक्षाच्या तिकिटासाठी कोणीही दावा करू शकतो. अंतिम निर्णय पक्षाच्या संसदीय मंडळानेच घ्यायचा आहे. स्थानिक पातळीवर तो निर्णय होणार नाही. मी नुकतीच उत्पल पर्रीकर यांना भेटलो. पण आमच्यात तिकीटावर कोणतीही चर्चा झाली नाही, असे त्यांनी सांगितले.

pm modi to visit up : PM मोदींचा यूपीत विकास कामांचा धडाका; ६,२५० कोटींच्या योजनांचे उद्घाटन करणार

महत्वाचे लेख