अ‍ॅपशहर

माओवाद्यांचे भीषण हल्ले! कुठे आणि कधी?

गेल्या दहा वर्षांचा आढावा घेतल्यास माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांत अनेक निरपराध नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यापैकी काही भीषण हल्ले -

महाराष्ट्र टाइम्स 2 May 2019, 3:31 am
गेल्या दशकभराचा आढावा घेतल्यास माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांत अनेक निरपराध नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यापैकी काही भीषण हल्ले -
महाराष्ट्र टाइम्स.कॉम moist-attack


२०१३: सुकमा -

- छत्तीसगड राज्यातील सुकमा जिल्ह्यात दरभा खोऱ्यात केलेल्या हल्ल्यात राज्याच्या माजी मंत्र्यांसह २७ जमांचा मृत्यू झाला.

२०१२: बरीगनवा -

- झारखंड राज्यात गढवा जिल्ह्यातील बरीगनवा येथे माओवाद्यांनी शक्तिशाली भूसुरुंग स्फोट केला. यामध्ये एका पोलिस अधिकाऱ्यासह १३ पोलिसांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले.

२०११: गरियाबंद -

- छत्तीसगडमधील गरियाबंद येथे माओवाद्यांनी एक पूल उडवला. यामध्ये चार जण मरण पावले, तर पाच जण जखमी झाले. याखेरीज त्याचवर्षी मे महिन्यात माओवाद्यांनी १० पोलिसांना ठार केले, तर या हल्ल्यात अनेकजम जखमी झाले.

२०१०: छत्तीसगड, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल -

- छत्तीसगड राज्यातील दंतेवाडा येथे माओवाद्यांनी सातत्याने सुरक्षाकर्मींवर हल्ले केले. यामध्ये ७६ जवानांना वीरमरण आले. यात सीआरपीएफ जवान व दोघा पोलिसांचा समावेश होता.

- पश्चिम बंगालमधील सिलदा येथे निमलष्करी तळावर घुसून माओवाद्यांनी २४ जवान ठार केले.

- ८ ऑक्टोबर २०१० रोजी छत्तीसगड व महाराष्ट्र यांतील सीमा भागात माओवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट केला. यामध्ये तिघे इंडो-तिबेटी सीमा पोलिस ठार झाले आणि एका सैनिकी जीपचे नुकसान झाले.

- माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात त्रिवेणी एक्सप्रेस व कोलकाता-मुंबई मेल रुळांवरून घसरल्या. यापैकी कोलकाता-मुंबई मेल रुळांवरून घसरल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात सुमारे १५० जण मृत्यूमुखी पडले.

२००९: गडचिरोली -

- गडचिरोली जिल्ह्यातील पुष्तोला येथे २७ मार्च रोजी माओवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट केला, ज्यामध्ये निमलष्करी दलाचे १५ जवान ठार झाले.


२००८: नयागड -

- ओडिशामधील नयागड येथे माओवाद्यांनी भीषण हल्ला केला. यामध्ये एक नागरिक आणि १४ पोलिस ठार झाले.

२००७: छत्तीसगड -

- रानी बोडी गावातील पोलिस आऊटपोस्टवर माओवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये छत्तीसगड राज्य पोलिस दलातील ५५ पोलिस व एक विशेष पोलिस अधिकारी मरण पावले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज