अ‍ॅपशहर

'हाफीज सईदला पाकमध्ये घुसून ठार मारा'

अमेरिकी सैन्यानं ९/११ हल्ल्याचा मास्टरमाइंड ओसामा बिन लादेनला पाकिस्तानात घुसून ठार मारलं होतं. भारतीय सैन्यानंही पाकिस्तानात घुसून लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफीज सईदला ठार मारावं, असा तीव्र संताप उरी हल्ल्यात शहीद झालेले जवान हवालदार अशोककुमार यांची पत्नी संगिता देवी यांनी व्यक्त केला आहे.

Maharashtra Times 30 Sep 2016, 3:23 pm
मटा ऑनलाइन वृत्त । आरा/गया
महाराष्ट्र टाइम्स.कॉम martyrs widow to pm modi kill lashkar chief hafiz saeed
'हाफीज सईदला पाकमध्ये घुसून ठार मारा'


अमेरिकी सैन्यानं ९/११ हल्ल्याचा मास्टरमाइंड ओसामा बिन लादेनला पाकिस्तानात घुसून ठार मारलं होतं. भारतीय सैन्यानंही पाकिस्तानात घुसून लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफीज सईदला ठार मारावं, असा तीव्र संताप उरी हल्ल्यात शहीद झालेले जवान हवालदार अशोककुमार यांची पत्नी संगिता देवी यांनी व्यक्त केला आहे.

भारतीय जवानांनी सर्जिकल स्ट्राइक करून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. त्यांनी केलेल्या या कारवाईनं मला खूपच आनंद झाला आहे. देशासाठी कोणतंही त्याग करायची माझी आणि कुटुंबीयांची तयारी आहे, असंही संगिता देवी म्हणाल्या. मोदी सरकारनं पाकिस्तानातील दहशतवादी आणि त्यांच्या तळांवर बॉम्ब टाकताना मागेपुढे पाहू नये, जेणेकरून माझ्यावर जी वेळ आली आहे, ती इतर भारतीय सैनिकांच्या पत्नींवर येऊ नये, असंही त्या म्हणाल्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज