अ‍ॅपशहर

ईव्हीएममध्ये घोळ: मायावतींचा आरोप

‘उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपकडून ईव्हीएम मशिनमध्ये छेडछाड करण्यात आली होती, हे निवडणूक निकालातून सिद्ध होते. मतदारांनी कोणत्याही पक्षाला मतदान केले, तरी ते मत भाजपलाच मिळाल्याने भाजपचा विजय झाला आहे. भाजपने लोकशाहीची हत्या केली आहे,’ असा आरोप मायावती यांनी केलापुन्हा निवडणुका घेण्याचीही मागणी त्यांनी केली.

Maharashtra Times 12 Mar 2017, 1:27 am
वृत्तसंस्था, लखनौ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mayawati blames evm tampering for poor up uttarakhand showing
ईव्हीएममध्ये घोळ: मायावतींचा आरोप


‘उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपकडून ईव्हीएम मशिनमध्ये छेडछाड करण्यात आली होती, हे निवडणूक निकालातून सिद्ध होते. मतदारांनी कोणत्याही पक्षाला मतदान केले, तरी ते मत भाजपलाच मिळाल्याने भाजपचा विजय झाला आहे. भाजपने लोकशाहीची हत्या केली आहे,’ असा आरोप मायावती यांनी केलापुन्हा निवडणुका घेण्याचीही मागणी त्यांनी केली. मायावती यांच्या या आरोपांना काँग्रेसनेही पाठिंबा दिला आहे. मात्र निवडणूक आयोगाने ईव्हीएममध्ये फेरफार झाल्याचा आरोप फोटाळून लावताना पुन्हा निवडणुका घेणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले.

‘उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड विधानसभा निवडणुकीचा निकाल हा कोणालाही रुचणारा नाही. मतदारांनी कोणत्याही पक्षाला मतदान केले असले, तरी ते मत भाजपलाच मिळाले असल्याने भाजपचा विजय झाला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतही माझ्या पक्षातील कार्यकर्त्यांनी ईव्हीएम मशिनमध्ये छेडछाड असल्याचा आरोप केला होता. परंतु, तेव्हा मी काँग्रेसविरोधी वातावरण आणि मोदी लाट असेल, असा विचार करून शांत बसले. परंतु, आता ईव्हीएम मशिनमध्ये घोळ असल्याचे स्पष्ट होते. कारण, मुस्लिम प्रभाव असलेल्या भागामध्ये भाजपचा विजय होणे शक्यच नाही. राज्यात मुस्लिमांची २० टक्के मते आहेत.

भाजपने एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिले नव्हते. तरीही मुस्लिमांचा प्रभाव असलेल्या भागात भाजपचा विजय होणे, कोणीही स्वीकारणार नाही,’ असे मायावती म्हणाल्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज