अ‍ॅपशहर

उत्तर प्रदेशात मांस विक्रेते बेमुदत संपावर

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील अनधिकृत कत्तलखान्यांवर कारवाईचा बडगा उगारल्याने मांस विक्रेते संतापले आहेत. सरकारने केलेल्या या कारवाईचा निषेध म्हणून मांस विक्रेत्यांनी बेमुदत संप पुकारला असून मांस विक्रेत्यांच्या या संपामुळे उत्तर प्रदेश सरकारला ११ हजार ३५० कोटींचं नुकसान सोसावं लागणार आहे.

Maharashtra Times 27 Mar 2017, 1:28 pm
मटा ऑनलाइन वृत्त । लखनऊ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम meat sellers strike in up mutton chicken missing buyers fish for options
उत्तर प्रदेशात मांस विक्रेते बेमुदत संपावर


मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील अनधिकृत कत्तलखान्यांवर कारवाईचा बडगा उगारल्याने मांस विक्रेते संतापले आहेत. सरकारने केलेल्या या कारवाईचा निषेध म्हणून मांस विक्रेत्यांनी बेमुदत संप पुकारला असून मांस विक्रेत्यांच्या या संपामुळे उत्तर प्रदेश सरकारला ११ हजार ३५० कोटींचं नुकसान सोसावं लागणार आहे.

योगी आदित्यनाथ यांच्या कारवाईपूर्वी राष्ट्रीय हरित लवादाने कत्तलखान्यांवर बंदी आणली होती. भाजपने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्व बेकायदा कत्तलखाने बंद करण्याची घोषणा केली होती. भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेईल, त्यादिवशी रात्री १२ वाजल्यापासून ही कारवाई सुरू होईल, असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी प्रचारसभेत म्हटलं होतं. त्यानुसार आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची सुत्रे हाती घेताच या कत्तलखान्यांवर कारवाईला सुरुवात केली. या कारवाईमुळे हॉटेल व्यवसाय मोडकळीस आला आहे. अनेक हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद झालेले आहेत. त्यामुळे मटण, चिकन आणि मासे विक्रेत्यांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. तर ज्यांच्याकडे परवाना आहे, अशा कत्तलखान्यांवर कारवाई होणार नाही, असं योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केलं आहे.

कत्तलखान्यांवर सुरू असलेल्या कारवाईचं काही जणांकडून समर्थन केलं जात आहे, तर काही जणांकडून विरोधही केला जात आहे. कारवाई करावी, पण आम्हाला काही वेळ द्यावा, कारण परवाना काढण्याची प्रक्रिया जाचक आहे, असं मांस विक्रेत्यांचं म्हणणं आहे. मात्र त्यांच्या म्हणण्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्याने अखेर मांस विक्रेते संपावर गेले आहेत.

मासे महागले!

काही ठिकाणी मासे विक्री सुरू असल्याने ग्राहकांनी मासे घेण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. खास करून बंगाली ग्राहकांची मासे खरेदीसाठी झुंबड उडाल्याने मासे ३० ते ५० टक्क्यांनी महागात विकले जात आहेत. तरीही अनेक ग्राहक जास्तीत जास्त मासे विकत घेत असल्याचं चित्र आहे. मटन-चिकन बंद असल्याने मासळी बाजारात मासे खरेदीसाठी ग्राहकांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज