अ‍ॅपशहर

मेघालयात भाजपच आयोजित करणार बीफ पार्टी!

भाजपच्या बीफ बंदीच्या निर्णयाला इशान्य भारतात पक्षांतर्गत विरोध होताना दिसत आहे. विशेषत: मेघालयातल्या भाजपा नेत्यांचा या निर्णयास आक्षेप आहे. कत्तलीसाठी गुरांच्या विक्रीवर बंदी आणण्याची अधिसूचना केंद्र सरकारने काढली आहे. त्याला विरोध म्हणून मेघालय भाजपचा एक नेता मोदी सरकारला ३ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त बीफ पार्टी देण्याच्या तयारीत आहे!

Maharashtra Times 1 Jun 2017, 1:58 pm
मटा ऑनलाइन वृत्त । शिलाँग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम meghalaya bjp to host beef party to celebrate 3 yrs of modi government
मेघालयात भाजपच आयोजित करणार बीफ पार्टी!


भाजपच्या बीफ बंदीच्या निर्णयाला इशान्य भारतात पक्षांतर्गत विरोध होताना दिसत आहे. विशेषत: मेघालयातल्या भाजपा नेत्यांचा या निर्णयास आक्षेप आहे. कत्तलीसाठी गुरांच्या विक्रीवर बंदी आणण्याची अधिसूचना केंद्र सरकारने काढली आहे. त्याला विरोध म्हणून मेघालय भाजपचा एक नेता मोदी सरकारला ३ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त बीफ पार्टी देण्याच्या तयारीत आहे!

'मोदी सरकारला ३ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने गारो हिल्स भाजप 'बिची बीफ पार्टी'चे आयोजन करणार आहे,' अशी पोस्ट उत्तर गारो हिल्स जिल्ह्याचे भाजप अध्यक्ष बाचु चाम्बुगाँग माराक यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर केली आहे. (बिची म्हणजे तांदळाची बिअर) या पोस्टमुळे माराक यांना भाजपतून निलंबित करण्यात येणार असल्याचे मेघालयचे पक्षप्रभारी नलिन कोहली यांनी सांगितले.

माराक यांनी 'द टेलिग्राफ'ला सांगितले की, 'आम्ही बीफ पार्टीचे आयोजन करणार आहोत, कारण बीफ हे आमचे पारंपरिक खाद्य आहे. आम्ही गारो समाजाचे लोक बीफ खाल्ल्याशिवाय राहू शकत नाही. पक्षनेतृत्वाने यावर मार्ग काढला नाही, तर आम्हीच पक्ष सोडणार आहोत. पण तोडगा निघाला तर आम्ही पक्षातच राहू. पक्षाने बीफबंदी केली तर गारो हिल्समध्ये पक्षाला कोणताच पाठिंबा मिळणार नाही.'

मेघालयात पुढील वर्षी होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये फटका बसू नये म्हणून भाजप आपल्या निर्णयापासून फारकत घेण्याच्या विचारात आहे. नलिन कोहली यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेत भाजपची भूमिका मांडताना सांगितले, 'गुरांच्या कत्तलीसंदर्भात कायदा करायचा की नाही हे सर्वस्वी राज्य सरकारांनी ठरवायचे आहे. स्थानिक समाजाच्या सवयी लक्षात घेऊन त्यानुसार प्रत्येक राज्य सरकार कायद्याची अंमलबजावणी करायची वा नाही ते ठरवत असते. इशान्य भारतात लोक बीफ खातात, याची दखल तेथील सरकार याची घेतीलच.'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज