अ‍ॅपशहर

​राष्ट्रपतिपदासाठी विरोधकांकडून मीरा कुमार

'रालोआ'ने दलित चेहरा असलेल्या रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपतिपदाची उमेदवारी जाहीर केल्यानंतर आज काँग्रेसने माजी लोकसभाध्यक्षा मीरा कुमार यांना राष्ट्रपतिपदाची उमेदवारी जाहीर केली आहे.

Maharashtra Times 22 Jun 2017, 6:17 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम meira kumar to be oppositions presidential candidate
​राष्ट्रपतिपदासाठी विरोधकांकडून मीरा कुमार


'रालोआ'ने दलित चेहरा असलेल्या रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपतिपदाची उमेदवारी जाहीर केल्यानंतर आज काँग्रेसने माजी लोकसभाध्यक्षा मीरा कुमार यांना राष्ट्रपतिपदाची उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांची आज बैठक पार पडल्यानंतर सोनिया गांधी यांनी मीरा कुमार यांना राष्ट्रपतिपदाची उमेदवारी देत असल्याची घोषणा केली.

राष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधी पक्षाकडून संयुक्त उमेदवार निवडीसाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली १७ विरोधी पक्षांची बैठक पार पडली. मीरा कुमार या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या असून दलित चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. माजी उपपंतप्रधान बाबू जगजीवन राम यांच्या कन्या असलेल्या मीरा कुमार यांनी लोकसभाध्यक्षपद भूषवलेले आहे. राष्ट्रपतिपदासाठी विरोधी पक्षाकडून मीरा कुमार यांच्या नावासह माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे, गोपाल कृष्ण गांधी आणि भारिपचे नेते प्रकाश आंबडेकर यांच्या नावाची चर्चा होती.

Congress president Sonia Gandhi announced former Lok Sabha Speaker Meira Kumar's name for #PresidentialElection. pic.twitter.com/39PL0S1VqE — ANI (@ANI_news) June 22, 2017
एनडीएने रामनाथ कोविंद यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर बसपाच्या मायावती यांनी दलित चेहरा असलेल्या कोविंद यांना पाठिंबा दिला होता. आता मीरा कुमार या सुद्धा दलित असल्याने मायावती कोणाला पाठिंबा देणार, हे पाहणे उचित ठरणार आहे. रामनाथ कोविंद यांना शिवसेना पक्षासह अनेक पक्षांनी आपला पाठिंबा आधीच जाहीर केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज