अ‍ॅपशहर

वाचवा वाचवा! मॅनेजरचा मदतीसाठी टाहो, १५ मिनिटं आक्रोश करत राहिला; मर्सिडीज कारनं जीव घेतला

दिल्लीजवळील नोएडामधील सेक्टर ९३ येथे एल्डिको चौकात भरधाव मर्सिडीज कार दुभाजकावर चढून झाडावर धडकली. यानंतर कारनं पेट घेतला. कारमधून एका खासगी कंपनीचा सिनीयर मॅनेजर प्रवास करत होता. पेटत्या कारमधून बाहेर येऊ न शकल्यानं त्याचा जळून मृत्यू झाला.

Authored byकुणाल गवाणकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Feb 2023, 3:58 pm
नोएडा: दिल्लीजवळील नोएडामधील सेक्टर ९३ येथे एल्डिको चौकात भरधाव मर्सिडीज कार दुभाजकावर चढून झाडावर धडकली. यानंतर कारनं पेट घेतला. कारमधून एका खासगी कंपनीचा सिनीयर मॅनेजर प्रवास करत होता. पेटत्या कारमधून बाहेर येऊ न शकल्यानं त्याचा जळून मृत्यू झाला. आग लागल्यानंतर कार ऑटोमॅटिक लॉक झाली. त्यामुळे मॅनेजर बाहेर पडू शकला नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Untitled design (82)


मंगळवारी रात्री उशिरा कारला अपघात झाला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कार कापून मृतदेह बाहेर काढला. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. नवी दिल्लीतील रोहिणी परिसरात वास्तव्यास असलेले अनुज सहरावत जेसीबी आणि ट्रॅक्टर निर्मिती करणाऱ्या एसीई कंपनीत सिनीयर मॅनेजर होते. फरिदाबादमध्ये त्यांचं कार्यालय होतं.
बापरे! ३८८ ड्रायव्हर, ३४५ जणांचा एकच नंबर; १८ बँक खाती अन् १ कोटीचा चुना; Uberला मोठा गंडा
रोहिणीसोबतच नोएडाच्या सेक्टर १६८ मध्येही त्यांचं घर आहे. मंगळवारी रात्री ते मर्सिडीजमधून दिल्लीहून नोएडाला निघाले. सेक्र ९३ मध्ये एल्डिको कटजवळ त्यांचं कारवरील नियंत्रण सुटलं. कार दुभाजकावर चढली आणि एका झाडावर आदळली. त्यानंतर कारला आग लागली. कार आतून लॉक झाली.

कार आतून लॉक झाल्यानं अनुज आतमध्येच अडकले. आसपासच्या लोकांनी याची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाला दिली. यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. पोलिसही दाखल झाले. कार नंबरच्या आधारे पोलिसांनी अनुज यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आणि त्यांना अपघाताची माहिती दिली.
कार पळवली; कुटुंबाला संपवण्यासाठी कड्यावरून पाडली; भारतीयाच्या कारनाम्यानं अमेरिका सुन्न
अनुज जवळपास १५ मिनिटं कारमधून बाहेर पडायचा प्रयत्न करत होते. आगीची तीव्रता वाढत होती. अनुज यांनी मदतीसाठी आक्रोश केला. मात्र कार लॉक झाल्यानं त्यांना बाहेर पडता आलं नाही. कार लॉक असल्यानं आसपासच्या लोकांनादेखील त्यांची मदत करता आली नाही. मदत मागता मागता अनुज यांचा मृत्यू झाला.

अपघात होताच कारनं पेट घेतला. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली. त्यानंतर कार कटरनं कापण्यात आली आणि अनुज यांचा मृतदेह बाहेर काढला. यामध्ये जवळपास तास लागला. यानंतर मृताच्या कुटुंबीयांना अपघाताची माहिती देण्यात आली. त्यानंतर रात्री अनुज यांचे कुटुंबीय दिल्लीहून नोएडाला आले.
लेखकाबद्दल
कुणाल गवाणकर
महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.... आणखी वाचा

महत्वाचे लेख