अ‍ॅपशहर

मिग विमान अपघात; ११ दिवसांनी सापडला बेपत्ता पायलटचा मृतदेह

मिग २९ के या विमानाचे पायलट कमांडर निशांत सिंग यांचा मृतदेह नौदलाच्या हाती आला आहे. गेल्या ११ दिवसांपासून गोव्याच्या समुद्रात त्यांचा शोध घेण्यात येत होता. मिग विमानाला अपघात झाल्यानंतर निशांत सिंग हे बेपत्ता होते.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Dec 2020, 9:29 pm
नवी दिल्लीः गेल्या महिन्यात २६ नोव्हेंबरला अपघात झालेल्या ( mig 29k crash ) मिग -२९ के या लढाऊ विमानाचे पायलट कमांडर निशांत सिंग ( nishant singh ) यांचा मृतदेह नौदलाने ताब्यात घेतला आहे. कमांडर निशांतचा यांचा मृतदेह आज ११ दिवसानंतर गोव्याच्या किनाऱ्यापासून ( goa coast ) ३० मैलांच्या अंतरावर व्यापक शोध मोहीमानंतर ( indian navy ) सापडला. मृतदेह ७० मीटर खोल पाण्यात होता. अरबी समुद्रात कार्यरत असताना मिग -२९ के या विमानाला अपघात झाला होता.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nishant singh navy
मिग विमान अपघात; ११ दिवसांनी सापडला बेपत्ता पायलटचा मृतदेह


२६ नोव्हेंबरला कमांडर निशांत यांनी विमानवाहू जहाज आयएनएस विक्रमादित्यवरून विमानाचे टेकॉऑफ केले. पण थोड्या वेळाने त्यांचे हे विमान कोसळले. या दुर्घटनेत एका पायलटला वाचवण्यात यश आलं. मात्र कमांडर निशांत हे आढळून आले नाही. यानंतर नौदलासह हवाई दलाकडून त्यांचा शोध घेतला जात होता. निशांत यांचा मृतदेह सापडल्यानंतर शोधमोहीम थांबवण्यात आली आहे.

मिग -२९ चा सांगाडा गोव्यापासून ७० किमी अंतरावर आढळला होता. नौदलाने या विमान अपघात प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. अपघाताच्या कारणांचा तपास केला जात आहे.

दिल्लीत ५ दहशतवाद्यांना पकडले, २ पंजाब आणि ३ काश्मीरशी संबंधित

काश्मीरमधील दहशतवादाबरोबरच खलिस्तानी आंदोलनाला हवा देतेय ISI: दिल्ली पोलिस

मिग -२९ के हे मूळचे टू सीटर रशियन प्रशिक्षक जेट विमान आहे. ही विमानं विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रमादित्यवरून कारवाई करण्यासाठी खरेदी केले गेले. अलिकडेच अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारतीय नौदलाने अरबी समुद्रात युद्ध सराव केला. या युद्ध सरावात मिग -२९ के या विमानांचाही समावेश होता.

सुशांतसिंह राजपूत मृत्युप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका, 'ही' मागणी केली गेली

विशेष म्हणजे यावर्षी फेब्रुवारी महिन्यात गोव्यात नियमित सरावा दरम्यान मिग विमान कोसळले होते. मात्र, त्या घटनेत सुखरुपपणे बाहेर पडण्यात पायलट यशस्वी झाला होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज