दुबई : लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली गायक मिका सिंगला दुबईत ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त आहे. ब्राझीलची नागरिक असलेल्या १७ वर्षांच्या मुलीच्या तक्रारीवरून मिकाला ताब्यात घेण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार, पोलिस स्टेशनमध्ये मिकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. मिकाने आपल्याला आक्षेपार्ह फोटो पाठवल्याचा या मुलीचा आरोप आहे. मिकाला पहाटे तीन वाजताच ताब्यात घेण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, मिका सिंग एका शोसाठी गेल्या काही दिवसांपासून दुबईत असून त्याच्या सुटकेसाठी मित्रमंडळींकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत.
मिका सिंग दुबईत पोलिसांच्या ताब्यात
लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली गायक मिका सिंगला दुबईत ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त आहे...
Maharashtra Times 7 Dec 2018, 4:00 am