अ‍ॅपशहर

milind deora : मिलिंद देवरांच्या मनात काय? गुजरात मॉडेलचे कौतुक केल्याने काँग्रेसला टेन्शन

काँग्रेसचे उत्तर प्रदेशातील बडे नेते जितीन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसला झटका बसला आहे. अशातच मुंबईतील काँग्रेसचे बडे नेते मिलिंद देवरा यांनी ट्वीट करून गुजरात सरकारच्या कामाचे कौतुक केले आहे. यामुळे महाराष्ट्रात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Jun 2021, 8:43 am
नवी दिल्लीः माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे बडे नेते जितीन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता राजस्थानमधील काँग्रेसचे बडे नेते सचिन पायलट आणि मिलिंद देवरा हे ही नाराज असल्याचं बोललं जात आहे. अशातच मिलिंद देवरांनी गुजरात सरकारच्या कामाचे कौतुक केल्याने टेन्शन वाढले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम milind deora
जितीन प्रसादांनंतर मिलिंद देवरांचा नंबर? गुजरात मॉडेलचे कौतुक केल्याने काँग्रेसला टेन्शन


करोनाच्या संकटामुळे गजरातमध्ये हॉटेल उद्योग, रेस्टॉरंट, रिसॉर्ट आणि वॉटर पार्क बंद आहे. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान पाहता मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी त्यांचा एक वर्षाचा मालमत्ता कर आणि वीज बिल माफ केले आहे. काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवरून ही बातमी शेअर केली आहे. तसंच गुजरात सरकारचे कौतुक केले आहे. इतर राज्यांनी अनुकरण करावे, असे स्वागतार्ह पाउल आहे. देशातील पर्यटन क्षेत्रातील नोकऱ्यांचे आणखी नुकसान रोखण्यासाठी सर्व राज्यांनी तातडीने निर्णय घेणं गरजेचं आहे, असं मिलिंद देवरांनी ट्वीटमध्ये म्हटलंय.

जितीन प्रसादांच्या भाजप प्रवेशावर देवरा म्हणाले...

जितीन प्रसादांच्या भाजप प्रवेशावर देवरा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसला आपले गत वैभव मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. देशातील मोठा पक्ष असलेली काँग्रेस हे करू शकते आणि करायला हवं आहे. पक्षात अजूनही असे नेते आहेत ज्यांना बळ दिल्यास आणि त्यांचा योग्य उपयोग केल्यास त्याचे चांगले परिणाम दिसून येतील. माझे अनेक मित्र, सन्मानित सोबती आणि मूल्यवान सहकाऱ्यांनी आमचा साथ सोडायला नको होती, असं देवरा म्हणाले.

jyotiraditya scindia : जितीन प्रसाद यांच्या भाजप प्रवेशाने ज्योतिरादित्य शिंदे खुश, म्हणाले...

जितीन प्रसादांचा भाजप प्रवेश काँग्रेसच्या जिव्हारी! बिश्नोई म्हणाले...

काँग्रेसच्या युवा ब्रिगेडला खिंडार

मिलिंद देवरा, जितीन प्रसाद, ज्योतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट यांना काँग्रेसची युवा ब्रिगेड म्हटले जात होते. त्यांनी केंद्रातील काँग्रेसच्या यूपीए सरकारमध्येही काम केले होते. यापैकी ज्योतिरादित्य शिंदे आणि जितीन प्रसाद हे भाजपमध्ये गेले. आता पायलट आणि देवरा हे पक्षातील काही मुद्द्यांवरून नाराज दिसून येत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज