अ‍ॅपशहर

ग्रेनेड हल्ल्यातून मंत्री बचावले

जम्मू-काश्मीरचे सार्वजनिक बांधकाममंत्री नईम अख्तर गुरुवारी ग्रेनेड हल्ल्यातून थोडक्यात बचावले.

Maharashtra Times 22 Sep 2017, 3:00 am
श्रीनगर : जम्मू-काश्मीरचे सार्वजनिक बांधकाममंत्री नईम अख्तर गुरुवारी ग्रेनेड हल्ल्यातून थोडक्यात बचावले. पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथे प्रवास करत असताना त्यांच्या ताफ्यावर हा ग्रेनेड हल्ला झाला. त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आणि दोन पोलिसांसह सहा जण जखमी झाले. अख्तर यांचा ताफा त्राल भागातून जात असताना सकाळी पावणे बाराला हा ग्रेनेड हल्ला झाला. त्यामध्ये गुलाम नबी त्राग (वय ५६) आणि पिंकी कौर (वय १७) यांचा मृत्यू झा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम militants attack ministers convoy kill two civilians
ग्रेनेड हल्ल्यातून मंत्री बचावले


या घटनेनंतर मंत्री अख्तर म्हणाले, ‘मी सुखरूप आहे; पण दोघांचा बळी या हल्ल्यात गेला, याचे मला खूप दु:ख आहे. माझ्या गाडीचा ड्रायव्हर गंभीर जखमी आहे. त्याला उपचारांसाठी विमानाने श्रीनगरला नेण्यात आले आहे.’

पाकिस्तानचे हल्ले सुरूच

‘जम्मू आणि सांबा जिल्ह्यांत आंतरराष्ट्रीय सीमेवर असलेली भारतीय लष्कराची ठाणी आणि काही गावांवर पाकिस्तानी लष्कराने बुधवारी रात्रीपासून गोळीबार सुरू केला. त्यामध्ये तीन नागरिक जखमी झाले,’ अशी माहिती सीमा सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. तो म्हणाला, ‘अर्निया विभागातील ‘बीएसएफ’च्या चौक्यांवर गोळीबार करून पाकिस्तानी रेंजरनी चिथावणी दिली. त्यानंतर त्यांनी बॉम्बगोळ्यांचाही मारा केला. हा गोळीबार गुरुवारी सकाळपर्यंत सुरू होता. भारतीय जवानांनी या हल्ल्याला सडेतोड उत्तर दिले.’

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज