अ‍ॅपशहर

RSS मुस्लिमांना देणार रमजानची इफ्तार पार्टी

मुस्लिम समाजाला एकजूट करण्यासाठी रमजानमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे. गाईचं दूध आणि त्यापासून तयार पदार्थाचं इफ्तार पार्टीत वाढले जातील, असा निर्णय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुस्लिम मंचने घेतला आहे. एक प्रयोग म्हणून हा प्रयत्न केला जाणार आहे.

Maharashtra Times 21 May 2017, 2:42 pm
मटा ऑनलाइन वृत्त । लखनऊ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम milk products only iftars by rss muslim wing in up
RSS मुस्लिमांना देणार रमजानची इफ्तार पार्टी


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मुस्लिम समाजासाठी रमजानमध्ये एक खास इफ्तार पार्टी आयोजित केली आहे. पण या इफ्तार पार्टीत गाईचं दूध आणि त्यापासून तयार झालेले पदार्थ असणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुस्लिम मंचने ही इफ्तार पार्टी आयोजित केली आहे. एक प्रयोग म्हणून संघ हा प्रयत्न करणार आहे. 'गायींचे संरक्षण आणि तिचे मांस खाण्याने होणाऱ्या वेगवेगळ्या आजारांची माहिती देण्याचा या मागचा उद्देश आहे', असं मुस्लिम मंचाचं म्हणणं आहे.

'गाईचं दूध आणि त्यापासून तयार झालेल्या डेअरी पदार्थांचा यंदा रमजानच्या इफ्तार पार्टीत समावेश असेल. उत्तर प्रदेशात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. गाईचे दूध आरोग्यदायी आहे आणि त्यापासून बनवलेले तूप औषधाचे काम करते. अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये गाईच्या तुपाचा उपयोग केला जातो', असं राष्ट्रीय मुस्लिम मंचचे युपी आणि उत्तराखंडचे संयोजक महिराज ध्वज सिंह यांनी सांगितलं.

'रमजानमध्ये नमाजावेळी गायींच्या संरक्षणाचे आवाहन केले जाईल. पशु, पक्षी, झाडं आणि झुडपं हे सर्व अल्लाहची देन आहेत. या सर्वांबाबत मानवी दृष्टीकोन ठेवला तर अल्लाहचा करम होईल', असं संयोजक सिंह म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक के. सी. सुदर्शन यांच्या प्रयत्नातून २००२ मध्ये राष्ट्रीय मुस्लिम मंचची स्थापना झाली होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज